अखेर विमान उडाले ; सोलापूरच्या विमानसेवेचा प्रारंभ ; केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दाखवला झेंडा…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ जून
अखेर कित्येक वासांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे. या विमानसेवेचा शुभारंभ सोमवारी सकाळी झाला.
गोव्यामधून दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले. हे विमान सोलापुरात सव्वा अकराच्या सुमारास उतरले याच वेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्या विमानाचे स्वागत केले. यावेळी विमानाला वॉटर कॅनोन सल्यूट देण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत होणार होता परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे विमान उडू शकले नाही. पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मात्र सोलापूरला आले.
पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते, आमदार राजू खरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजीत पाटील, शहाजी पवार, अमोल शिंदे त्यांच्या उपस्थितीत सोलापूर गोवा विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम स्थळी सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या पाच प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात विमान तिकिटाचे वाटप करण्यात आले.
यावेळी नामदार मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांच्यासह सर्व आमदार भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.