सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड ठाकरे सेनेत दाखल ; शिवसेनेच्या शिवआरोग्य सेनेच्या सोलापूर जिल्हा आरोग्य संघटकपदी नियुक्ती….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २४ जुलै – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे , शिवसेना नेते, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर, शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेना जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे यांच्या शिफारशी नुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या उपस्थितीत शिवआरोग्य सेनेच्या सोलापूर जिल्हा आरोग्य संघटकपदी जोतिबा गुंड यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना शिवसेना भवन येथे नियुक्ती पत्र देऊन पदभार देण्यात आला.
यापूर्वी देखील ज्योतिबा गुंड यांनी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर काम केले आहे. याच कामाची दखल घेण्यात आले. याप्रसंगी शिवसेना सोलापूर शहर सचिव अनिल जाधव सोलापूर विभागप्रमुख प्र.१३ सुरेश शिंदे,शिवसेना माहीम विधानसभा उपविभागप्रमुख यशवंत विचले,आरोग्य सेना भांडुप आरोग्य साची प्रवीण ढवळे, गणेश छत्रबंद आदींची उपस्थिती होती.