किसन भाऊंचा कामाचा धडाका ; सोनी नगर परिसर ते‎ सय्यद बुखारी‎ बाबा‎ दर्गा‎ या‎ रस्त्याच्या काँक्रीटीकरण‎ कामाचे उद्घाटन…

सोनी नगर‎ दर्ग्यात चादर‎ अर्पण करून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

सोलापूर‎ व्हिजन न्युज,

सोलापूर दि.४ नोव्हेंबर

सोलापूर‎ महानगरपालिका प्रभाग‎ क्र. २२ मध्ये विकासाची नवी वाटचाल सुरू झाली‎ आहे. सोलापूर‎ महापालिकेचे माजी‎ गटनेते व राष्ट्रवादी‎ काँग्रेस (अजित‎ पवार गट)‎ चे‎ प्रदेश‎ उपाध्यक्ष‎ तसेच‎ प्रभाग क्र.‎ २२‎ चे माजी नगरसेवक‎ किसन जाधव आणि नागेश‎ गायकवाड यांच्या पुढाकाराने‎ लोकशाहीर‎ अण्णाभाऊ साठे‎ नागरी‎ वस्ती‎ सुधारणा योजना‎ अंतर्गत‎ सोनी नगर परिसर ते‎ सय्यद बुखारी‎ बाबा‎ दर्गा‎ या‎ रस्त्याच्या काँक्रीटीकरण‎ कामाचे उद्घाटन करण्यात‎ आले.

या कामासाठी‎ सन‎ २०२४-२५ या हेड‎ अंतर्गत‎ १६‎ लाख २०‎ हजार ४४९ रुपये खर्च‎ करण्यात येणार असून, रस्ते‎ विकासाबरोबरच‎ नागरिकांना‎ दर्जेदार‎ सुविधा उपलब्ध करून देण्याचा‎ संकल्प‎ यावेळी घेण्यात‎ आला.

यावेळी सोनी‎ नगर हुडको‎ येथील हजरत‎ सय्यद‎ जलालोद्दीन‎ बुखारी बाबा‎ दर्गा येथे‎ चादर‎ अर्पण करून धार्मिक एकतेचा‎ संदेश‎ देण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक‎ किसन जाधव म्हणाले, विकासकामे केवळ‎ रस्ते‎ आणि‎ गटारापुरती‎ मर्यादित नसून‎ प्रभागातील‎ सर्वसमावेशक विकासासाठी आम्ही‎ प्रयत्नशील‎ आहोत. सर्व‎ समाजघटकांचा सहभाग हेच‎ आमचे बळ आहे.‎ त्यांनी सांगितले की,‎ शैक्षणिक, आरोग्य,‎ क्रीडा‎ आणि नागरिकांच्या‎ मूलभूत‎ सुविधांच्या उभारणीसाठीही‎ सातत्याने‎ काम सुरू‎ आहे.प्रभागातील‎ नागरिकांनी‎ या विकासकामाचे स्वागत‎ करत नगरसेवक‎ किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे‎ आभार‎ मानले.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे‎ प्रदेश‎ युवक सरचिटणीस‎ चेतन‎ नागेश गायकवाड, राज‎ मुजावर,‎ सुलेमान मुजावर, सय्यद‎ मुजावर, बाबुलाल‎ मुजावर, हाजी‎ भाई मस्तान‎ मुजावर, अमीन‎ मुजावर, आसिफ मुजावर, सूफियान‎ मुजावर, मौलाना हुसेन‎ साब,मौला चिंचोळकर, शरीफ‎ पटेल, मेहबूब शेख‎ अजीम सय्यद‎ महंमद‎ शेख‎ अमिन‎ शेख हुसेन शेख‎ सूफियान शेख, संजय भडंगे,‎ विश्वनाथ जाधव,किसन माने,सरफराज सय्यद ,फिरोज‎ पठाण, माणिक कांबळे, वसत कांबळे, महादेव‎ राठोड,‎ आनंद गाडेकर, आदी‎ मान्यवर‎ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *