सोलापूर महानगरपालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान पूजा श्रीकांत वाडेकर यांना !
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.१७ जानेवारी
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ.पूजा श्रीकांत वाडेकर वयाच्या २३ व्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान मिळविला आहे. सौ पूजा श्रीकांत वाडेकर यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असून, समाजकारण आणि राजकारण दोन्हीची सांगड घालून त्या आपले पती श्रीकांत वाडेकर त्याचप्रमाणे मोठे जितू आणि बापूसाहेब वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून कामकाज पाहणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, त्यांनी प्रभाग क्रमांक ९ क मधून विक्रमी असे १४८२३ मते मिळवत माजी आमदार आडम मास्तर यांच्या कन्या अरुणा आडम माकपा ३५२६ यांचा दारुण पराभव केला. राजकारणात आणि समाजकारणात वाडेकर कुटुंबीयांचे महत्त्वाचे योगदान असून, त्या कामाच्या जोरावर पूजा श्रीकांत वाडेकर कमी वयात महापालिकेत यशस्वीरित्या कामकाज पाहणार आहेत.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त युवा मतदारांना या निवडणुकीत संधी दिली, पूजा श्रीकांत वाडेकर ह्यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली. आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे पॅनल विजयी झाले.
पूजा श्रीकांत वाडेकर ह्या कमी वयाच्या उमेदवार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामांवर जास्तीत जास्त लक्ष देणार असल्याचे पूजा श्रीकांत वाडेकर यांनी सांगितले.