महापौरसाठी भाऊजींचे नाव चर्चेत… सोशल मीडियावर व्हायरल होतीय पोस्ट

महापौरसाठी लगीन घाई ; विनायक कोंड्याल यांचे नाव चर्चेत 

सोशल मीडियावर पोस्ट होतीय व्हायरल

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१७ जानेवारी

सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नव निर्वाचित नगरसेवकांचे लक्ष महापौर पदासह स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, यापदाकडे लागलेले दिसत आहे. राजकीय नेत्यांना देखील आपला कार्यकर्ता महापौर तसेच सभापतीच्या खुर्चीवर विराजमान व्हावा, असे मनोमन वाटत आहेत. मात्र भाजप पक्षातील श्रेष्ठींनी ज्या नावावर शिक्कामोर्तब करतील, तोच त्या पदाचा हकदार असणार आहे. या सगळ्या घडामोडीत सोलापूर महापालिका पुरुष प्रवर्गासाठी खुला करण्यात आला, तर विनायक कोंड्याल यांचे नाव चर्चेत येत आहे. तसे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र आरक्षण चिठ्ठ्या काढून केले जाणार आहे. चिट्ठीनुसार जे प्रवर्ग येईल त्यानुसार महापौर पद देणार असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १२ मधून विनायक कोंड्याल यांनी हॅट्रिक साधली आहे. त्यांनी शिवसेनेच्या पोतन यांचा १४ हजार मतांच्या फरकाने पराभव केला.प्रभाग क्रमांक १२ अ.मध्ये विनायक कोंड्याल यांना तब्बल १६,३८१ मते मिळाली. मताधिक्य १४,३६७ इतके विक्रमी मिळाले. तर शिवसेनेच्या श्रीनिवास पोतन यांना अवघे २२३० इतकी मते मिळाली. त्यामुळे विनायक कोंड्याल यांचे नाव महापौर पदाच्या रेसमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसत आहे.

तत्पूर्वी सोलापूर महापालिकेचे महापौरपदी आरिफ शेख यांच्यानंतर अलका राठोड, सुशीला आबुटे, शोभा बनशेट्टी आणि श्री कांचना यन्नम हे महापौर झाले आहेत. आता पुरुष प्रवर्गासाठी महापौरपद खुले होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मतमोजणी झाल्यानंतर विजय जल्लोष करण्यात आला. शनिवारी सकाळी निवडणूक जिंकल्यानंतर विनायक कोंड्याल यांनी देखील फेसबुक पोस्ट शेअर करत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *