स्वावलंबी भारत अभियान आणि उद्यम फाउंडेशन, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यात सामंजस्य करार

कौशल्य आधारित, आत्मनिर्भर सोलापूर बनविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल…

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि २३ जुलै – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी उपक्रम राबविण्याकरिता स्वावलंबी भारत अभियान आणि उद्यम फाउंडेशन, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

देशभरात नवउद्योजक घडविणे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास व्हावे याकरिता स्वावलंबी भारत अभियान कार्यरत आहे. स्वावलंबी भारत अभियानतर्फे सोलापूरमध्येही अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या उद्यम इनक्युबेशन सेंटर आणि स्वावलंबी भारत अभियानच्या माध्यमातून आगामीकाळातही अनेक उपक्रम करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पना ऐकून व्हॅलिडेट करणे, मार्केटिंग, हॅन्ड होल्डिंग सपोर्ट दोघांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता आज दोन्ही संस्थांमध्ये  सामंजस्य करार करण्यात आले. स्वावलंबी भारत अभियानचे जिल्हा समन्वयक विनायक बंकापूर आणि उद्यम फाउंडेशनतर्फे डॉ. राजेश गूरानी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सेवावर्धिनी स्वावलंबी भारत अभियानाचे विभाग समन्वयक आणि विद्यापीठाचे अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर, सहसमन्वयक मयंक चौहान, प्रकल्प अधिकारी श्रीनाथ गायकवाड, उद्यमचे व्यवस्थापक श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *