महेश कोठे जयंतीनिमित्त बालकांचा स्केटिंग उत्सव; ५० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग ; विजेत्यांना चषक व प्रमाणपत्रांचे वितरण
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.६ मार्च
महेश कोठे यांच्या ६२ व्या जयंतीदिनानिमित्त दत्तात्रय बडगंची मित्र परिवाराच्या वतीने स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सोना चांदी कॉम्प्लेक्स, प्रगती चौक, जुना विडी घरकुल येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत ५ ते १४ वयोगटातील सुमारे ५० मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बालकांनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली. विजेत्या स्पर्धकांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक प्रथमेश कोठे, प्रशांत पल्ली, सतीश सिरसिल्ला, अविनाश दासरी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्केटिंग प्रशिक्षक युसूफ पिरजादे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे बालकांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असल्याची भावना नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी व्यक्त केले. दरम्यान, स्पर्धेचे आयोजक दत्तात्रय बडगंची यांनी या स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट करताना बालकांमध्ये खिलाडूवृत्ती रुजावी यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी दत्तात्रय बडगंची मित्रपरिवार आदींसह खेळाडू आणि पालक उपस्थित होते.
