श्रीनिवास भाऊंनी सामाजिक कार्यातून “मध्य” साठी ठोकला शड्डू !
राजकीय वर्तुळात प्रस्थापितांना देणार धक्का….!
प्रतिनिधी|सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर,दि.२९ सप्टेंबर – श्री प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अल्पावधीतच तेलुगू भाषिकांच्या मना मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले,” श्रीनिवास संगा” हे लोकप्रिय ठरत आहेत. संगा यांनी पद्मशाली समाजाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सामाजिक कार्यातून समाजामध्ये एक जिव्हाळा निर्माण केला आहे. यामुळे अबालवृद्ध आणि महिला वर्गामध्ये श्रीनिवास भाऊंचा आदर आणि महत्व वाढत आहे. समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी हीरहिरीने पुढाकार घेऊन त्या सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक समाज बांधवांशी जवळकीचे नाते निर्माण करत त्यांच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होत असल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.
दरम्यान शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी तेलुगू भाषिकांचा मेळावा आयोजित संपन्न झाला. या मेळाव्यात तेलगू भाषिकांना येणाऱ्या अडीअडचणींबाबत चर्चा करून उपाय योजना करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. सोलापुरात तेलुगू भाषिक पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पद्मशाली समाजाच्या अनेक पिढ्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र काही दुर्बल घटक या विविध लाभांपासून वंचित राहिलेले आहेत. अशा दुर्बल घटकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांचे राहणीमान उंचवावे, यांसारख्या विविध प्रश्नांवर तेलुगू भाषिक संघर्ष समिती आणि श्री प्रतिष्ठानच्या वतीने तेलुगू भाषिकांना येणाऱ्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उहापोह करण्यात आला.
तत्पूर्वी श्रीनिवास संगा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपचा झेंडा हाती घेत, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदारकी लढवण्याचा निर्धार केला आहे. समाजाच्या गाऱ्हाणी मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसतात. यामुळे त्यांना तेलुगू भाषिक पद्मशाली समाजाचा चांगलाच पाठिंबा मिळत असल्याने अनेक राजकारणातील अनेक प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. ” जुने तेच, ते चेहरे नको आता”, असे म्हणत श्रीनिवास भाऊ तुम्ही आमदारकीच्या रिंगणात उतराच अशी अपेक्षा कार्यकर्ते आणि समाज बांधव व्यक्त करत आहेत. कार्यकर्ते आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास भाऊंचा फॅक्टर चांगलाच काम करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
युवावर्गात गाजणार भाऊंचा फॅक्टर…
श्रीनिवास संगा प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात नेहमीच पुढाकार घेत असतात. विविध संघटना आणि मंडळाचे कार्यकर्ते श्रीनिवास सांगा यांच्याशी एक वेगळ्या प्रकारचे नाते टिकवून आहेत. ग्राउंड लेव्हल ला भाऊंच्या कामाची वेगळीच पोचपावती या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास भाऊंचा फॅक्टर सर्वांना दिसून येईल.
हिंदू-मुस्लिम ऐक्य…
ज्याप्रमाणे हिंदू धर्मियांचे विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केल्या जातात. तशाच पद्धतीने मुस्लिम धर्मियांच्या सणांमध्ये देखील भाऊ हिरीहिरीने सहभागी होतात. गणेशोत्सव नंतर आलेल्या ईद-ए-मिलाद सणांमध्ये देखील श्रीनिवास भाऊंनी आपल्या मित्र कंपनीत ईदचा सण साजरा केला. यामाध्यमातून मुस्लिम बांधव देखील श्रीनिवास संगा यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते.