श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी बाळासाहेब मुस्तारे यांची निवड
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या यंदाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी बाळासाहेब मुस्तारे, उपाध्यक्षपदी राहूल बुऱ्हाणपुरे, महेश हदरे, अभिजीत कुलकर्णी तर सचिवपदी सिद्धेश्वर आळंद यांची एकमताने निवड करण्यात आली. सालाबादप्रमाणे यंदाच्या श्रीगणेश उत्सव समिती कार्यकारिणी निवडची बैठक येथील श्री मंदिरात घेण्यात आली. अजीत शेडजाळे यांच्या अध्यक्षतेखाली श्री.सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या वार्षिक बैठकीत मागील सन 2024-25 या वर्षातील मंडळाचे कार्यप्रणाली आणि कामगिरीबाबतचा अहवाल वाचन मंडळाचे जेष्ठ सदस्य तथा ट्रस्टी सचिव मल्लिनाथ खुने यांनी सादर केला. वर्षभरातील विविध उपक्रम राबविल्याबाबतचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यास उपस्थित सर्व सदस्यांनी मंजूर दिली. मंडळाचे नुतन उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांनी या वेळी नाविन्य पूर्ण मिरवणूक तथा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या ऐतिहासिक मंडळाची परंपरा यंदाच्या वर्षी कायम असून हा गणेशोस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. उत्सव प्रिय सोलापूरकरा मध्ये शांतता पूर्ण मिरवणूक तथा आदर्श गणेशोस्तव मंडळ अशी ख्याती असणाऱ्या मंडळाची ओळख आजतागायत कायम राखल्या बद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

नुतन उत्सव समिती अध्यक्ष मुस्तारे यांनी मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त, कार्यकर्ते आदींनी आपल्या अध्यक्ष पदाकरिता केलेल्या निवडीबाबत आनंद व्यक्त करत मंडळाचा उत्सव परंपरेस अनुसरून नाविण्यपूर्ण विधायक उपक्रमासह साजरा करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. नूतन उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती करण्यात आली. श्री.सुधीर थोबडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे ट्रस्टी उपाध्यक्ष प्रकाश वाले, मल्लिनाथ खुने, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, गुरुलिंग समाणे, संजय दर्गोपाटील, शिवानंद बुगडे, रामचंद्र जोशी, बीप्पीन धुम्मा, सोमनाथ मेंगाणे, राजशेखर विजापूरे, आनंद मुस्तारे, विकास धुम्मा, अप्पासाहेब कुताटे, शशिकांत बिराजदार, लक्ष्मण भाईकट्टी, बसवराज अय्यांगार, मल्लिनाथ इमडे, चिदानंद मुस्तारे, रतिकांत हदरे, शिवानंद दर्गोपाटील, अमीत गुंगे, अमर चव्हाण, गुरूशांत मोकाशी, जितेंद्र लाड, शिवलिंग माळगे आदींची प्रमुख उपस्थित होती.
कसबा गणपती नूतन पदाधिकारी निवड – 2025-2026
• उत्सव अध्यक्ष : बाळासाहेब मुस्तारे
• उपाध्यक्ष : राहूल बुऱ्हाणपुरे, महेश हदरे, अभिजीत कुलकर्णी
• सचिव : सिद्धेश्वर आळंद
• खजिनदार : केदार मेंगाणे
• प्रसिद्धीप्रमुख : पुष्कराज मेत्री
• मिरवणूक प्रमुख : जगदीश हिरेहब्बू, नागनाथ मेंगाणे, मनिष मसरे, प्रतिक थोबडे, सागर हिरेहब्बू
• लेझीम प्रमुख : कैलास मेंगाणे, आकाश हदरे, विनायक शरणार्थी, योगेश हदरे
• पूजा समिती : गिरी स्वामी, सिद्धू स्वामी, गिरराज भोगडे, संदीप जोशी, गुरू पटणे,
जीवन जोशी, रवी भोगडे, संजय बिराजदार