अवधूतचिंतन श्री स्वामी समर्थांच्या जयघोषाने पसरले नवचैतन्य !
प्रकट दिनानिमित्त सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३१ मार्च
“अवधूतचिंतन गुरुदेव दत्त… अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! जयघोषाने सारा मंदिर परिसर दुमदुमला”… निमित्त होते, श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे ! विजापूर रोड येथील सुंदरम नगर येथे असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. यावेळी आबालवृद्ध भाविकांनी पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ मंदिरात गर्दी केली.

दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. तत्पूर्वी रविवारी गुढीपाडवा निमित्त मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अवतार कांड सामूहिक वाचन संध्याकाळी संपन्न झाले. त्यानंतर रामा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता संपन्न झाला. श्रींची महाआरती रात्री गणपत लोकुरे, सिद्धलिंग कांबळे मधुकर शिंदे, राहुल उळागड्डे, राजू पवार, राजेश आदने यांच्या हस्ते संपन्न झाली.

तदनंतर सोमवार दि.३१ मार्च रोजी सकाळी प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ मूर्तीस लघु रुद्राभिषेक व रुद्वसहाकार सकाळी सहा वाजता संपन्न झाले. शशिकांत लोंढे जे प्रकाश कळमणकर अथर्व खांडेकर यांच्या हस्ते सदरची पूजा व महाभिषेक संपन्न झाल. सकाळी दहा वाजता श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे सामूहिक पारायण करण्यात आले. यावेळी रोहिणी पावर शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पारायण संपन्न झाले. दिवसभर भक्तांची मांदियाळी श्रींच्या दर्शनासाठी उसळली होती. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साही वातावरणात व नवचैतन्यात संपन्न झाली. यावेळी डॉ. हेगडेवार रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. विविध अलंकारांनी अलंकृत करण्यात आलेली श्रींची मूर्ती आकर्षक आणि लक्षवेधी ठरत होती. यावेळी सामूहिक पोथीचे पारायण करण्यात आले. त्यामुळे साऱ्या मंदिर परिसरात नवचैतन्य आणि प्रसन्नतेचे वातावरण दिसून आले. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे व मंदिराचे अध्यक्ष रमेश मेंढापूरकर, उपाध्यक्ष पंडित गायकवाड, सचिव संजोग सुरत गावकर, सहसचिव लक्ष्मण यादव, खजिनदार रविशंकर हत्याळीकर, आदींसह ट्रस्टी विश्वस्थ आबालवृद्ध व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रांगोळीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांची आकर्षक प्रतिकृती…
श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. शहरातील सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ अंतर्गत श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमा आयोजित करण्यात आले होते. मंदिराच्या दर्शनी भागात श्री स्वामी समर्थ महाराजांची रांगोळीमध्ये आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली होती. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या मंदिरा बाहेर रांगा दिसून आल्या.श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ अंतर्गत श्री स्वामी समर्थ मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरवासीयांनी मंदिरात येऊन श्रींचे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.
-रमेश मेंढापूरकर, अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ
बनशंकरी नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्साहात संपन्न…
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा निमित्त सोलापूर शहरातील बनशंकरी नगर, म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्यानिमित्त पालखी नगर प्रदक्षिणा रविवार (दि. ३०) मार्च रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली. त्यानंतर सोमवार (दि.३१) मार्च रोजी स्वामी समर्थ मंदिरात सकाळी ७ वाजता अभिषेक भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजता गुलाल व महाआरती त्यानंतर महाप्रसाद संध्याकाळी ७ वाजता महाराजांची पालखी आणि रात्री ठीक ८ वाजता आरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

दरम्यान, सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ईच्छा स्वामी समर्थांची महिला सेवाभावी संस्था यांच्यावतीने धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी धुळे सोलापूर परिसरातील आबाल वृद्ध भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सदस्य तसेच स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जुळे सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रींचा प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न”
ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी अवधूतचिंतना श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोलापूर शहर जिल्ह्यात संपन्न झाला. जुळे सोलापूरच्या समर्थ नगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दि. २७ मार्च रोजी सायं. ७ वा. ह.भ.प. नागनाथ पाटील यांचे हरी पारायण शुक्रवार दि. २८ मार्च रोजी सायं. ७ वा.महात्मा बसवेश्वर व ज्ञानेश्वरी तसेच कार्यक्रमानंतर महाप्रसाद, शनिवार दि. २९ मार्च रोजी सायं. ७ भक्ती संगीत सेवा संपन्न झाला. प्रकट दिनानिमित्त सोमवार दि.३१ मार्च सकाळी सुहासिनी महिलांच्या हस्ते कलश मिरवणूक मोठ्या उत्साही वातावरणात काढण्यात आली.

तदनंतर ९ ते १२ वाजेपर्यंत शिवानंद स्वामीजी करजगी व बसवराज शास्त्री तिर्थ यांचे हस्ते होम हवन कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता गुलाल तसेच महाआरती व पाळणा कार्यक्रम संपन्न करण्यात आले. पाळणा कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. सायं. ७ वा. लक्ष दिपोत्सव व आरती असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती युवराज राठोड यांनी दिली.
यावेळी वैशाली चंद्रकांत शहापुरे, चंद्रकांत शहापुरे, युवराज राठोड, श्रध्दा शहापुरे, शकुंतला मोरे, मिनाक्षी राठोड, विद्या कोळी, रेश्मा सोलनकर, अर्चना होळकर,अपर्णा प्रयाग, ज्योती ढवारे, सरोजा कोळी, अर्चना अचलेरे, जगदेवी पाटील, रोहिणी साने, रेखा पवार,.सुवर्णा सलगरे, उर्मिला नवले, हेमलता गवळी, सारीका परबतराव, अनिता कराडे, पूजा कंचे, कल्पना रोकडे, अनिता हिरेमठ एकता राठोड, राजश्री गायकवाड, सरिता शालगर आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.