श्रीस्वामी समर्थ चिन्मय पादुकांचे श्री प्रतिष्ठानने केले भक्तीमय वातावरणात स्वागत ;

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर , दि. ९ सप्टेंबर – अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन केलेल्या धर्मपीठ व वैश्र्वानर अवतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचे पुजन,दर्शन आणि महाप्रसाद सोहळा उत्साहात श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरू मंदिर , बाळप्पा मठ व विश्व फाऊंडेशन शिवपुरी अक्कलकोट यांच्यावतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

तत्पूर्वी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी पादुकाचे सहकुटुंब स्वागत केले. श्री प्रतिष्ठानच्या वतीने चिन्मय पादुकांचे पूजन अर्चन आई प्रतिष्ठानच्या कुमारी सृष्टी डांगरे आणि विश्व फाउंडेशनच्या पुरोहित वृंदांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिक यांनी चिन्मय पादुकांचे दर्शन आणि महाप्रसाद ग्रहण केला.
दरम्यान या कार्यक्रमास वेणुगोपाल जिल्ला पंतुल , अण्णा खरात , सुमित भोसले , सागर कदर , अभिजीत वाघमारे , गजेंद्र कलादगी , विश्वनाथ दुर्लेकर , सतीश भोसले , हिरालाल चनापट्टणम , गणेश साळुंखे, सतीश सिर्सिल्ला, संतोष बसूदे, किशोर मार्गम, तुषार जक्का , विजय आमदाळे , मधुकर सरगम, मधु पुठ्ठा , संतोष दांडगे , वैजनाथ उघडे आदींची उपस्थित होते.