शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी कृषी प्रदर्शन वरदान ठरणार – डॉ. सचिन ओम्बासे

शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी कृषी प्रदर्शन वरदान ठरणार – डॉ. सचिन ओम्बासे

सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२६ डिसेंबर

सुमारे दहा वर्षांपूर्वी असलेले शेतीमालाचे भाव कमी अधिक प्रमाणात आजही सारखेच आहेत. मात्र यंत्र आणि खतांचे दर कैक पटीने वाढले आहेत. ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांच्या आजच्या आणि दहावर्षापूर्वीच्या दरात मोठी तफावत असल्याने शेती अधिक अडचणीत आल्याचे सांगतानाच उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांचे शेतीपूरक व्यवसाय वाढले पाहिजेत, त्यासाठी हे कृषी प्रदर्शन वरदानच ठरेल असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बास यांनी व्यक्त केला.

सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना आयुक्त डॉ. सचिन ओंबसे 

होम मैदानावर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्त आयोजित श्री सिध्देश्वर कृषी या कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी श्री सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी होते. याप्रसंगी व्यासपीठावर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, सिध्देश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, पंच कमिटीचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे, आत्माचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, प्रदर्शनाचे संयोजक स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी २५ ते २९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब म्हमाणे यांनी केले. संजीव समन यांनी आभार मानले. सिध्देश्वर बमणी, बाळासाहेब भोगडे, अॅड. शिवशंकर बिराजदार, राजशेखर पाटील, सुभाष मुनाळे, विश्वनाथ लब्बा, मल्लिकार्जुन कळके, महादेव जम्मा, विद्याधर मुलगे, सुरेश झळकी, पशुपतीनाथ माशाळ, डॉ. राजेंद्र घुली, शिवानंद पाटील, रतन रिक्के, प्रमोद बिराजदार निंबर्गी यांच्यासह सिध्देश्वर साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, पंच कमिटीचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *