महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन…

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ डिसेंबर
सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचे सोलापूरवासियांना आकर्षण कायम आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, आत्मा सोलापूर आणि जिल्हा परिषद कृषी विभाग, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५५ वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि.२५ डिसेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाचे खास आकर्षण हिंदकेसरी सोन्या बैल हा असणार आहे. तसेच प्रदूषणामध्ये डॉग आणि कॅट शो आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार आहे. या भव्य दिव्य कृषी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन कृषी प्रदर्शन समितीच्या वतीने करण्यात आली आहे..
या भव्य प्रदर्शनात शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले अंदाजे ५०० प्रकारचे दुर्मिळ देशी बी बियाणे प्रदर्शित केले जाणार आहेत
दि.२६ डिसेंबर रोजी गाय बैल वासरू म्हैस अशा विविध पशु प्रजातीचे तसेच देशी गोवंश मधील विविध प्रजातीचे भव्य प्रदर्शन व स्पर्धा असणार आहे.
दि.२७ डिसेंबर रोजी डॉग शो आणि कॅट शो होणार आहे. दुपारी तीन वाजता पुष्परचना स्पर्धा होणार आहे..