
सिध्दश्वर कृषी औद्योगिक प्रदर्शनात बुटकी म्हैस गाय, चायनाचा बोकड खातोय भाव.….

तर शेती उपयुक्त अवजारे बी बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
डॉग आणि कॅट शोने वेधले सर्वांचे लक्ष
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२२ डिसेंबर
शेतकऱ्यांकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक लाभदायी योजना आहेत. त्या योजनांचा शेतकऱ्यांनी वेळेत फायदा घेऊन आपला आर्थिक स्तर उंचवावा, असे आवाहन ‘आत्मा’चे संचालक अशोक किरनळ्ही यांनी केले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या अनुषंगाने शहरातील होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान, श्रीसिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी याप्रसंगी बोलताना म्हणाले, या कृषी प्रदर्शनच्या नमित्ताने उभारण्यात आलेल्या तीनशे स्टॉल्सच्या माध्यमातून तकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान असलेल्या अवजारांची माहिती मिळणार आहे. दहा किलो वजनाचा कोंबडा, पुंगनूर गाय, लांब कानाचा बोर जातीचा बोकड यांसह कुत्रा, बैल हे या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

यावेळी श्रीसिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, श्रीसिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य सिध्देश्वर बमणी, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे. जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, श्रीसिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते. गुरुराज माळगे यांनी प्रास्ताविक केले. शेटे यांनी आभार मानले.
कृषी प्रदर्शनात संपन्न झाला डॉग आणि कॅट शो.
श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आज डॉग शो मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉग आणि कॅट प्रेमींनी आपल्या पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन दाखवून, बक्षीस पटकावले. विविध प्रजातींच्या डॉग आणि कॅटचा यामध्ये समावेश होता. ज्या डॉगचा आणि कॅटचा प्रथम द्वितीय क्रमांक आला त्या विजेता स्पर्धकांना ट्रॉफी देण्यात आली.
बुटकी म्हैस आणि गाय, वजनदार कोंबडा तसेच चायनाचा बोकड पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.
५४ व्या राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात नाविन्य असे, बुटकी म्हैस आणि गाय तसेच चायनाचा बोकड दाखल झाले आहेत. म्हैस गाय बोकड आणि वजनदार कोंबडा पाहण्यासाठी शेतकरी व नागरिकांची एकच गर्दी होत आहे.
त्याच पद्धतीने खिलार प्रजातीचे वळू देखील येथे सहभागी झाले आहेत. या वळूना देखील शेतकऱ्यांमधून पसंती मिळत आहे. त्याचप्रमाणे विविध शेती उपयोग अवजारे, खते, बी- बियाणे, संकरित बियाणे असे विविध प्रकारचे स्टॉल्स टाकण्यात आले असून, प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली.