श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजेने मिरवणुकीला सुरुवात…

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजेने मिरवणुकीला सुरुवात…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१९ फेब्रुवारी

हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीचे पूजन आमदार सुभाष देशमुख, पोलीस आयुक्त एम.राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे,  उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे आदी मान्यवरांच्या हस्ते महापूजा करून श्रीशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणुकीची मोठ्या उत्साहात शिवमय सुरुवात झाली.

        दरम्यान, प्राची भजनी मंडळ यांच्या वतीने महिलांनी टाळनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आ.सुभाष देशमुख यांनी सर्व सोलापूर शहरवासीयांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी देखील यंदाची शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यास आवाहन केले. यावेळी सारे वातावरण अवघे शिवमय झाले होते. जयंती उत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

           तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. प्राणप्रतिष्ठापनेच्या काळामध्ये विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले होते. आरोग्य तपासणी, पाळणा महोत्सव असे कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर जयंतीउत्सवाचा शेवट छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीने झाला. प्रारंभी श्रीशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात जयंती उत्सवास सुरुवात 

सोलापूर शहरात शिव जयंतीचा उत्साह सर्वत्र पहावयास मिळत आहे. आकर्षक देखावे या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तसेच मराठा साम्राज्य देखावे यावेळी साकारण्यात आले होते. पारंपारिक ढोल ताशा पथक लेझीम सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.

श्रीकांत गायकवाड शिवप्रेमींनी आपल्या कारवर केली शिवरायांची प्राण प्रतिष्ठापना…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *