श्वासात रोखुणी वादळ.. डोळ्यात रोखली आग राजा माझा छत्रपती एकटा हिंदू वाघ…
चला साजरा करूया शिवजन्मोत्सव सोहळा घरा घरातून मनामनातून…स्वराज्य संस्थापक, स्वराज्य रक्षक
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा
मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वा भव्य पाळणा सोहळ्याच आयोजन शिवबाचा पाळणा विश्ववंदिता.. मनामनातून प्रज्वलित होईल राष्ट्रधर्माची ज्योत..स्त्रीशक्तीसह पुढे येऊन साजरा करूया शिवजन्मोत्सव.. राजमाता मासाहेब जिजाबाईंचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि नियमांचं आपणही अवलोकन करावं.. यासाठीच साकारत आहोत महिलांच्या उपस्थितीत शिवजन्मोसोहळा…
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर..
नऊवारी,पारंपरिक दागिने आणि आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची कास धरून महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे
संयोजक – श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ,सोलापूर
विनीत
ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे
उत्सव अध्यक्ष सीए सुशील चंदू बंदपट्टे
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१७ फेब्रुवारी
हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुजन प्रतिपालक, श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने भव्य दिव्य असा पाळणा कार्यक्रम संपन्न करण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता सुमारे पन्नास हजाराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जाणार आहे. पाळणा महोत्सवासाठी येणाऱ्या महिलांना वाहनाची व्यवस्था केली जाणार आहे. पारंपारिक वेशभूषेत महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. तत्पूर्वी पाळणा महोत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन
दरम्यान, डाळिंबी आड मैदान येथे आज सायंकाळी भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. कुस्तीप्रेमींनी कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.