छत्रपती केसरी ठरला विक्रम घोरपडे… ७१ हजार रोख व चांदीच्या गदेचा झाला मानकरी

लाल माती, हलगीचा कडकडाट, पैलवानांनी गाजवली कुस्तीची दंगल ; छत्रपती केसरी ठरला विक्रम घोरपडे   

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१७ फेब्रुवारी

हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाळींबी आड शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाला येथील मैदानात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सोमवारी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पैलवान कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते, हलगीच्या कडकडाटात कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली, कुस्ती स्पर्धेतील प्रमुख आकर्षण होते, कै पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ छत्रपती केसरी २०२५ ज्याचे बक्षीस होते ७१ हजार रुपये रोख आणि गदा, आणि कै पैलवान रामकृष्ण वानकर यांच्या स्मरणार्थ संभाजीराजे केसरी २०२५ ज्याचे बक्षीस होते, ४१ हजार रुपये रोख आणि चांदीची गदा.

छत्रपती केसरी या स्पर्धेसाठी कोल्हापूर चे पैलवान शुभम कोळेकर विरुद्ध अकलूज चे पैलवान विक्रम घोरपडे यांच्यात तर संभाजीराजे केसरी ही स्पर्धा कुर्डुवाडी चे पैलवान मोईन पटेल विरुद्ध कोल्हापूरचे पैलवान चरमन नंदगोंड यांच्यात कुस्तीची प्रमुख दंगल पहायला मिळाली, सदरच्या कुस्तीच्या डावपेचने सर्वांना खिळवून ठेवले.

यासह अरुण रोडगे यांच्या तर्फे ३१ हजार रोख बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूर चे पैलवान रविराज सरवदे विरुद्ध, ढोकबाभूळगावचे विक्रम घोरपडे, प्रीतम परदेशी यांच्या तर्फ २१ हजार रोख बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे  पैलवान गणेश कलागते विरुद्ध मंद्रुपचे पैलवान बबलू व्हनमाने, शैलेश पिसे यांच्या तर्फे २१ हजार रोख बक्षीस आणि ट्रॉफीसाठी अकलूजचे पैलवान आकाश ढेरे विरुद्ध कुर्डुवाडीचे पैलवान अमित सुळ, जयवंत सलगर यांच्या तर्फे २१ हजार रुपये बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान नागेश कलागते विरुद्ध वटवटेचे पैलवान औदुबर पाटील, केगावचे पैलवान मनोज देवकर विरुद्ध कामतीचे पैलवान दशरथ खराडे, भोसरीचे पैलवान प्रज्योत टाकळीकर विरुद्ध सोलापूरचे पैलवान समर्थ केत, सोलापुरचे पैलवान देवधर जगताप विरुद्ध कामतीचे पैलवान अथर्व कारंडे, सोलापूरचे पैलवान विनायक मनासावले विरुद्ध कामतीचे पैलवान शौर्य भोईटे यांच्यातील लढतीने प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले,

     या कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय कुस्ती पंच प्रा धनराज भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,मराठवाडा केसरी अतिष मोरे, सुरज  मोरे, रवी शेळके, अप्पा जाधव, यांनी पंच म्हणून काम पाहिले.यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, जन्मनजय राजे भोसले, ज्येष्ठ वकील धनंजय माने, संदीप कारंजे, श्रीकांत डांगे, चंद्रकांत वाणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने,  राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, चेतन नरोटे, नरेंद्र काळे, अण्णासाहेब रोडगे, शैलेश पिसे, बाळासाहेब पुणेकर,  राजू सुपाते, बापू जाधव, राजाभाऊ काकडे, श्रीकांत घाडगे, मनीष देशमुख, मनीष काळजे, विनोद भोसले ,दादू रोडगे,  पंकज काटकर, सुभाष पवार, अमर दुधाळ, महेश हनमे, प्रकाश ननवरे, दत्तमामा मुळे,  तात्यासाहेब वाघमोडे, अंबादास शेळके, सचिन स्वामी, बसवराज कोळी, देविदास घुले, तुषार गायकवाड, कृष्णा भुरळे, जेलपेश घुले, बाबा बनसोडे, राहुल मुद्दे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

 

स्पर्धेचा निकाल व विजेत्यांची नावे

१) छत्रपती केसरी (७१ हजार रुपये आणि गदा) – विक्रम घोरपडे

२) संभाजीराजे केसरी ( ४१ हजार रुपये आणि गदा )-मोईन पटेल

३)(३१ हजार रोख आणि ट्रॉफी ) रविराज सरवदे आणि शुभम मुळे बरोबरीत

४) (२१ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी ) गणेश कलागते

५) ( २१ हजार रोख आणि ट्रॉफी )अमित सुळ

६) ( १५ हजार रोख आणि ट्रॉफी )नागेश कलागते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *