शेकडो मुलांना वारकरी संस्कार मोफत देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणजे श्री संत सावता महाराज वारकरी प्रशिक्षण संस्था :- ह. भ. प .सुधाकर इंगळे महाराज

गीता पठण आणि मृदंग वादन संस्कार शिबिराची सांगता

शेकडो मुलांना वारकरी संस्कार मोफत देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणजे श्री संत सावता महाराज वारकरी प्रशिक्षण संस्था :- ह. भ. प .सुधाकर इंगळे महाराज…

श्री संत सावता महाराज वारकरी प्रशिक्षण संस्था केंद्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या गीता पठण व मृदंग वादन संस्कार शिबिराची सांगता प्रसंगी उपस्थित बालचमू…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१९ मे

श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेच्या वारकरी संस्कार शिबिराचा समारोप समारंभ निराळे वस्ती येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या बाल वारकऱ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

         कार्यक्रमात ह भ प सुधाकर महाराज इंगळे म्हणाले, आत्ताच्या युगामध्ये अशा संस्कारक्षम शिबिराची प्रामुख्याने गरज होती. कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता मोफत वारकरी प्रशिक्षण देण्यात ही संस्था अग्रगण्य ठरली आहे. महाराष्ट्रभर मी कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो पाहतो असे संस्था कुठेही पाहण्यास मिळाली नाही. असे गौरवोद्गार इंगळे महाराज यांनी काढले.

      प्रारंभी कार्यक्रमात ह भ प सुधाकर इंगळे महाराज, ऑक्टो पॅडचे प्रशिक्षक श्याम नाईकनवरे,नंथकुमार येणे, बळीराम जांभळे, प्रशिक्षक अनिकेत जांभळे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याकार्यक्रमास ज्ञानेश्वर सपाटे, शेखर फंड, संजय केसरे, चंद्रकांत जांभळे प्रामुख्याने यांची उपस्थिती होती. महिनाभरामध्ये ज्या मुलांनी विशेष प्राविण्य मिळवले अशा विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

       दरम्यान, या महिनाभरात विशेष सेवा करणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रशिक्षणार्थी मुलांनी गीतेचा बारावा अध्याय व पंधरावा अध्याय पठन केला. कार्यक्रमाचे समारोप पसायदानाने करण्यात आले. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी तुकाराम लोखंडे, समर्थ कांबळे स्वराज केसरी आर्यन खंदारे अंजली लोखंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार बळीराम जांभळे यांनी मानले.

प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान. 

गीता पठण विभाग

शर्वरी शिवाजी भोसले, कार्तिकी रत्नदीप काशिद, प्रगती विष्णू शिंदे, शौर्य ज्ञानेश्वर भोसले, प्रथमेश ढेरे, सोहम शिंदे

मृदंग वादन विभाग

श्रावणी संतोष काकडे, श्रेया सोपान लोहकरे, माधुरी अशोक सोमदळे, प्रणव अमोल पवार, श्रेयस नंदकुमार गात, ओम व्यवहारे, समर्थ कांबळे, स्वराज केसरे, तेजस सुर्वे, अथर्व कोकरे, राजवीर जांभळे, अंजली लोखंडे, प्राची यमगवळी, भक्ती परदेशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *