सोलापुरच्या पावननगरीमध्ये होणार अतीभव्य अतीदिव्य दुर्मिळ अतिरूद्र स्वाहाकार ;
पालकमंत्र्यांना देण्यात आले विशेष निमंत्रण …
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २१ ऑगस्ट – विश्व कल्याणासाठी, भारताच्या समृद्धीसाठी अतिरुद्र स्वाहाकार श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. सोलापूर शहरात अतिरुद्र स्वाहाकार असा कार्यक्रम प्रथमच होत असल्यामुळे या कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
त्याकरिता सत्संग मंडप, हवन मंडप, प्रसाद मंडप आदी मंडप उभारण्यात येत आहेत. सर्वांत मोठा सत्संग मंडप १०० बाय २२५ चौ. फुटांचा आहे. या मुख्य मंडपात सत्संग, शिवभस्मार्चन, पुरस्कार सोहळा आदी कार्यक्रम चालणार आहेत. तर हवन मंडप ६० बाय ९० चौ. फुटांच्या दुसऱ्या मंडपात हवन करण्यात येणार आहे. तर प्रसाद मंडप ५० बाय ८० फुटांचा असून त्यात महाप्रसाद देण्यात येणार आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत होणाऱ्या अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमाचे निमंत्रण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना श्री सदगुरु बसवारुढ मठाचे मठाधिपती श्रो.ब्र.श्री. शिवपुत्र महास्वामीजी याच्या हस्ते देण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी या अतिदुर्मिळ कार्यक्रमास उपस्थिती दर्शवण्याचे आश्वासन मठाधिपती शिवपुत्र महास्वामी यांना देत श्री सद्गुरु बसवारूढ मठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या आगळ्या वेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे कौतुक केले.याप्रसंगी सतीश कुलकर्णी, कृष्णांत पाटील, ॲड विश्वनाथ पाटील, मल्लिनाथ बनशेट्टी, संतोष पाटील, सचिन कोटाणे आदींची उपस्थिती होती.