श्रीसद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठात तैलचित्रांचे अनावरण
गुरूपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न
सोलापूर व्हिजन प्रतिनिधी –
सोलापूर दि २४ जुलै – श्री श्री श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठामध्ये श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी आणि सद्गुरु श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या तैलचित्राचे अनावरण जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदिपसिंग राजपूत, डॉ. सुहास पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
याप्रसंगी कृष्णात पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून मठात बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा निर्मिती संचाचेही उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी दत्तयाग आणि रुद्राभिषेक करण्यात आला. यानंतर प. पू. सद्गुरू श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांची महापूजा करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, उद्योगपती सतीश कुलकर्णी, कृष्णात पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रारंभी हिप्परगी येथील आरूढ बसवाश्रमचे श्रो. ब्र. श्री. सिद्धारुढ शरणू, रेवती पेंडसे यांचे प्रवचन झाले. तसेच प. पू. सद्गुरू श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिवे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे पुंडलिक कुंभार, ॲड. संतोष होसमनी, सुरेश सेडशाल, महेश नंदगावकर, जयकांत थोरात आदी उपस्थित होते.