श्री रुपाभवानी मंदिरात मोफत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद….!

हजारों रुग्णांनी घेतला सर्वरोग निदान तसेच औषधोपचाराचा लाभ !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ७ ऑक्टोंबर – येथील श्री रुपाभवानी देऊळ ट्रस्ट सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग सोलापूर व जिज्ञासा महानगर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मोफत आरोग्य तपासणीला देवी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री रुपाभवानी मंदिरात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे सोलापूर शाखेचे चेअरपर्सन एन.बी. तेली, निलेश पोफलिया, सुहास लाहोटी, विशाल वर्मा, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, शरणबसप्पा गुंडदस्वामी, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे, ऐश्वर्या सावंत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भूसारी, कृष्णा सकट, आकाश गायकवाड, आम्रपाली बनशेट्टी , अर्चना पारशेट्टी, कल्पना गडगडे आदी उपस्थित होते. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन गरजू रुग्णांसाठी हे शिबिर लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस होणार्या याशिबिरात पाचव्या दिवशी असंख्य रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना गरजेनुसार औषधे देण्यात आली. फ्लॅश मॉब आणि पथनाट्याद्वारे एड्सची कारणे, परिणाम व सकारात्मक जीवनशैली याविषयी जागृती करण्यात आली. याशिबिरात साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना टीबी होवु नये यासाठी लसीकरण, एचआयव्हीची तपासणी, शुगर, बीपी आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी संयोजक पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी केले.
श्री तुळजाभवानी माता मंदिरच्या धर्तीवर आरास.
श्री रूपाभवानी मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती, सकाळी वाजता श्रीखंड, दही, दूध, पंचामृतचे अभिषेक करण्यात आले. लोकमंगल बँकेचे जितेंद्र लाड यांच्यावतीने श्रीरूपाभवानी देवीला काजू,बदाम, सुके अंजीर या सुका मेव्यांची आरास करण्यात आली. तसेच जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने सुरेख ढोल वाजवण्यात आले.