श्रीरुपाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना …!
श्रीरूपाभवानी मातेच्या चरणी घातले सुख शांती समृद्धीचे साकडे..!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ०३ ऑक्टोंबर – अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव घटस्थापनेपासून मोठ्या उत्साहात सुरू त्याच अनुषंगाने सोलापूरची कुलस्वामिनी श्रीरूपाभवानी देवी मंदिरात ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मसरे कुटुंबीयांच्यावतीने घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला.
शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त गुरुवार (दि.०३)ऑक्टोंबर रोजी मंदिरात पहाटे चार वाजता प्रक्षाळ पूजा करण्यात आली.त्यानंतर सकाळी श्रीदेवीची नित्योपचारचार पूजा करून दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मसरे कुटुंबीयांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ (तम्मा)मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ होती.
तत्पूर्वी भाविकांना ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. त्याच पद्धतीने मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्स सजवण्यात आले आहेत. यामध्ये खेळणी, प्रसादिक साहित्य, विविध खाद्यपदार्थ, पाळणे आदींचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. तसेच दर्शनरांगा तयार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रवेश आणि बाहेर अशा पद्धतीच्या रांगा बॅरिगेट्स लावून करण्यात आले आहेत. नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजता महापूजा करून आली. तदनंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास छबीना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू दे हीच श्रीरूपाभवानी मातेच्या चरणी साकडे घातले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी देवीचे प्रतीरूप मानले जाणारे सोलापूरची कुलस्वामिनी श्रीरूपाभवानी देवी मातेच्या चरणी सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू दे हीच प्रार्थना केली.
– मल्लिनाथ मसरे, ट्रस्टी व पुजारी श्रीरूपाभवानी देवी मंदिर सोलापूर.