रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेस प्रारंभ महारुद्राभिषेक व महाआरतीने वातावरण बनले प्रसन्नमय…
ललितासहस्त्रनाम कुंकूमार्चनातील कुंकू भारतीय सीमेवरील सैनिकांच्या सन्मानार्थ पाठवणार
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२६ मे
सोलापूर शहरातील शुक्रवार पेठेतील रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेस रविवारपासून सुरूवात झाली. रविवारी मोठ्या उत्साहात ललितासहस्त्रनाम कुंकुमार्चन सोहळा झाला. तर आज सोमवारी सकाळी सुवासिनी महिलांची ओटी भरण हा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी १६०० महिलांच्या उपस्थितीत, दीड तास कुंकुमार्चन धार्मिक सोहळा संपन्न झाला. यावेळी चार पुरोहितांनी पौरोहित्य केले. प्रत्येक महिला भाविकांनी ताम्हण, एक रूपयांचे नाण, पळी आणले होते. मंदिरा कडून कुंकू देण्यात आले. एक हजार एक वेळा सहस्त्रनामाचा जयघोष झाला, प्रत्येक महिलांनी पूजा केल्यानंतर ताम्हणातील कुंकू चिमूटभर घेऊन जमा करण्यात आले. ते कुंकू भारतीय सीमेवरील सैनिकांच्या सन्मानार्थ कुरीअरने पाठवून देण्यात येणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत १३ माजी सैनिकांचा, बीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे भक्तीचा थाट आणि देशाभिमानाची भावना पाहायला मिळाली.
सुवासिनी महिला चौडेश्वरी मंदिरात दाखल झाल्या. पूजेसाठी बसायला मॅटींग, खुर्चाची सोय करण्यात आली होती. १०० स्वयंसेवक, २५ महिला, युवती स्वयंसेवक नियोजनासाठी नेमण्यात आले होते. हिंगुलांबिका देवी मंदिराचे पुरोहित- पुजारी संजय हंचाटे यांनी कुंकुमार्चन विधीचे मुख्य पौरोहित्य केले. वेदमूर्ती शिवशरण म्हेत्रे यांचीही साथ होती. सायंकाळी सातला मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला.
सोमवारी सकाळी चौडेश्वरी देवीस महारुद्राभिषेक व महाआरती…
सोमवार सकाळी दहाला सुवासिनी ओटीभरण सोहळा झाला. सकाळी सातला चौडेश्वरी देवीस महारुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिराचे सचिव गुरुनाथ निंबाळे यांनी केल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड काशीनाथ रूगे, उपाध्यक्ष लक्ष्मण मारडकर, अमर म्हेत्रे, नागेश कणगी, बसवराज चितली, सिध्दाराम गोकाई यांच्यासह पदाधिकारी, सदस्य नियोजन केले होते.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत माजी सैनिक, वीर माता, पत्नी यांचा सन्मान…
माजी सैनिक अरूणकुमार तळीखेडे, अंबण्णा माळी, अप्पासाहेब पुजारी, मल्लिनाथ हणमशेट्टी, राजकुमार जमखंडी, मल्लिकार्जुन मणूरे वीरपत्नी विठाबाई हेडे, शोभा पारलेलू, जयश्री पाटील, माजी सैनिक पत्नी शशिकला तळीखेडे, शरणम्मा हणमशेट्टी यांचा ट्रस्टच्या वतीने सन्मान झाला.
पुण्यप्राप्तीचे फळ मिळते..
ललितासहस्त्रनाम कुंकुमार्चन सोहळ्यामुळे मन एकाग्र होते. देवीच्या नामस्मरणामुळे समाधान मिळते. पुण्य प्राप्तीचे फळ मिळते. घरातही आर पूजा करू शकता. कुंकुमार्चन सोहळ्यामुळे देवीची आपल्यावर कृपा कायम राहते. शतपटीने फल मिळते. ऐश्वर्य, किर्ती, बल, पुन उर्जा मिळते. पापक्षालन होते.
– संजय हंचाटे, मुख्य पुरोहित कुंकुमार्चन सोहळा