श्रीनिवास संगा यांनी बोलवली महत्त्वाची बैठक ; या महत्त्वाच्या विषयावर घेणार निर्णय 

श्रीनिवास संगा यांनी बोलवली महत्त्वाची बैठक ; या महत्त्वाच्या विषयावर घेणार निर्णय 

मित्र परिवाराने उपस्थित राहण्याचे केले आवाहन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२८ ऑक्टोंबर- सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ लढवण्यासाठी इच्छुक असणारे श्रीनिवास संगा यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी डावलण्यात आल्याने येणारी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. याबैठकीस संगा मित्रपरिवाराने उपस्थित राहून आपले अनमोल मार्गदर्शन करावे असे आवाहन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संगा यांनी केले आहे.

        दरम्यान श्रीनिवास संगा यांनी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तेलुगु भाषिक संघर्ष समितीच्या माध्यमातून तेलुगु भाषिक महिलांचा प्रश्न आणि अडचणी सोडवल्या आहेत. अनेकांना आर्थिक तसेच मानसिक आधार देत स्वतःच्या पायावर उभे केले आहे.

मित्र परिवाराच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे करत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता, परंतु भाजप पक्षांतर्गत झालेल्या घडामोडींमुळे श्रीनिवास संगा यांचे नाव बाहेर पडले आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे सांगा यांनी आता आपल्या मित्रपक्षांचा आधार घेऊन निवडणूक लढाईची का नाही यावर विचारविनिमय करणार आहेत. जरी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असता तरीही, त्याबाबत यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची यावर देखील उहापोह केला जाणार आहे. त्यामुळे बैठकीस उपस्थित राहणारे आवाहन संगा यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *