श्री प्रतिष्ठानच्या पाताळ भैरवी देखाव्यास गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…..!
विशेषतः झाडांच्या सालीपासून साकारण्यात आला पर्यावरणपूरक गणपती बाप्पा….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. १५ सप्टेंबर – सोलापूर शहरात गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने धार्मिक , आध्यात्मिक , आणि कलात्मक देखावे सादर केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर श्री प्रतिष्ठानच्या वतीने देखील ७० फूट रोडवर गणेशोत्सवानिमित्त भव्यदिव्य असा पातळ भैरवी देखावा साकारण्यात आला आहे.
गणेश भक्तांना या आगळ्या वेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून पाताळ भैरवी देवीचे अस्तित्व दिसून येत आहे. सदरच्या देखव्याला गणेश भक्तांमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान श्री प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी धार्मिक आणि अध्यात्मिक चरित्र घेऊन देखावा साकारला जातो. मागीलवर्षी देखील अशाच पद्धतीने आकर्षक आणि आगळावेगळा श्रीशंभू महादेवाचा देखावा साकारण्यात आला होता.
यावर्षी देखील अनोखा पातळ भैरवी देखावा भक्तांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष करून देखाव्यातील गणपती हा पर्यावरणपूरक आसून झाडांच्या सालींपासून बनवण्यात आला आहे. दरवर्षी याच पद्धतीने गणपती बाप्पा साकारले जातात.
श्रीगणेश भक्तांना देखाव्यातून एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न…..
गणेशोत्सव गणेश भक्त देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. भक्तांना गणेशोत्सव काळात एक वेगळा आनंद मिळावा. तसेच त्यांची धार्मिक आणि अध्यात्मिक भावना वृद्धींगत व्हावी यासाठी श्री प्रतिष्ठान नेहमी प्रयत्नशील असते. यंदाचा पाताळ भैरवी देखावा हा आगळावेगळा असून यामध्ये झाडांच्या सालींपासून पर्यावरण पूरक गणपती साकारण्यात आला आहे. दरवर्षी वेग वेगळ्या थीम प्रमाणे देखावा सादर केला जातो. आणि भक्तांमधून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.
–श्रीनिवास संगा , अध्यक्ष श्री प्रतिष्ठान सोलापूर.
श्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणारे देखावे आगळे वेगळे असतात…..
श्री प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव काळात भक्तांसाठी एक वेगळी पर्वणी घेऊन येतात. गणेशोत्सव काळात आकर्षक देखाव्यातून भक्तांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण केली जाते. यंदाचा पातळ भैरवी देखावा हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साकारण्यात आल्याने भक्तांमध्ये याचे कुतूहल निर्माण झाले आहे.
– निर्मला कडगणी , महिला गणेश भक्त.