श्री मार्कडेय महामुनी रथोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गात बदल…

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कडेय महामुनी रथोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात काढण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मिरवणूका लक्षात घेता. सर्व सामान्य वाहनधारकांना मिरवणूक मार्गावर येण्या जाण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसा आदेश पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांनी काढला आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चा अधिनियम क्रं. २२ चे कलम ३३ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारान्वये या मार्गात बदल करण्यात आलेला आहे.
वाहनधारकांना बंद करण्यात आलेला मार्ग
पंचकट्टा श्री मार्कडेय मंदिर विजापुर वेस भारतीय चौक- शनिवार पेठ- मारुती मंदीरास वळसा घेवून- रत्न मारुती-जंगदबा चौक- पद्मशाली चौक-आंध्रदत्त चौक-सहकारी रुग्णालय भद्रावती चौक- जोडबसवण्णा चौक-मार्कडेय चौक-फैजूलबारी मस्जिद- रांजेद्र चौक-भुलाभाई चौक नेताजी नगर-चाटला कॉर्नर-जोडभावी पेठ-कन्ना चौक-औद्योगिक बँक, साखर पेठ- संयुक्त चौक- भावसार रोड-समाचार चौक-माणिक चौक-विजापूर वेस ते पंचकट्टा हा मार्ग व त्यास जोडणारे सर्व मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहेत.
वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाचा करावा अवलंब
सात रस्ता – रंगभवन चौक- डफरीन चौक-सरस्वती चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जाण्यासाठी-येण्यासाठी, दत्त चौक – माणिक चौक मधला मारुती बलीदान चौक रुपाभवानी चौक मड्डी वस्ती मार्गे पुढे जाण्यासाठी-येण्यासाठी, रंगभवन- पोटफाडी चौक संत तुकाराम चौक अशोक चौक विव्हको प्रोसेस शांती चौक जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्ड जाण्यासाठी व येण्यासाठी, दत्त चौक लक्ष्मी मार्केट भाजी मंडई पंचकट्टा मलंगशाह वली दर्गा पुनम चौक रंगभवन चौक पासून पुढे जाण्यासाठी – येण्यासाठी सुरू राहणार आहे. या मार्गाचा वाहनधारकांनी येण्या जाण्यासाठी अवलंब करावा असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
मिरवणूकीसाठी ८३३ पोलिसांचा राहणार बंदोबस्त
श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव मिरवणूक बंदोबस्तासाठी १ पोलीस आयुक्त, ३ पोलीस उप आयुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७५० पोलीस अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी, तेलुगु नाभिक समाजाचे श्री चिमटेश्वर महाराज, स्वकुळ साळी समाजाचे भगवान जिव्हेश्वर, कुरहणशेट्टी समाजाचे श्री नीलकंठेश्वर प्रभू रथोत्सव, तोगटवीर क्षत्रिय समाजाच्या चौडेश्वरी देवी उत्सवानिमित्त आणि नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन पवित्र श्रावण मासानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक – श्री देवेंद्र राजेश कोठे,आमदार भारतीय जनता पार्टी, सोलापूर