श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला निमित्त अवघा सेटलमेंट परिसर झाला श्री कृष्णमय……
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि. २९ ऑगस्ट – भगवान श्रीकृष्ण यांचं जन्म अनेक उद्देशाने झाला होता. त्यांच्या जन्माच्या लिला अनेक आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी गोपालकाला ही देखील त्याची एक लिला आहे. दही, लोणी,चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा मिळतात. श्रीकृष्णाला बालपणी दही,दूध,लोणी यापदार्थाची आवड होती यासाठी ते मित्र आपल्यासोबत आजूबाजूच्या गवळणींच्या घरी दही लोणी चोरी करत असत, अशा या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि शिवलाल महाराज यांचा प्रवचन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी दिले…
अशा या महान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीनिमित्त सेटलमेंट भागातील शिवलाल महास्वामीजी महाराज मठ येथे श्रीकृष्ण मंदिर येथे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी अमाप उत्साही आणि धार्मिक वातावरणात पार पडली. याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे, सुनिता रोटे नागेश बाबुराव गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब,लहुजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती..
दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला निमित्त श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या अमाप उत्साही वातावरणात संपन्न झालं. यावेळी श्रींची गुलाल व महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचा वाटप करण्यात आलं…
गोविंदा रे गोपाला अशा घोषणा देत अवघा सेटलमेंट परिसर श्री कृष्णमय झाला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी शिवलाल महाराज यांच्या उपस्थितीत सेटलमेंट परिसरात कुठल्याही आपत्ती येऊ नये यासाठी नगर प्रदक्षिणा घालण्यात आले. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अवघा सेटलमेंट परिसर श्रीकृष्ण झाला.