गणेश विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज…११ विसर्जन कुंड तर ७८ संकलन केंद्र उभारण्यात आले…

गणेश विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज…

गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरिता ११ विसर्जन कुंड तर ७८ संकलन केंद्र उभारण्यात आले…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन व्हिजन न्युज 

सोलापूर , दि. १३ सप्टेंबर – श्री गणेश विसर्जन २०३४ करिता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल उगले यांच्या निर्देशानुसार इंद्रभवन येथील मीटिंग हॉल  येथे श्रीगणेश उत्सव विसर्जना संदर्भात आज सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, उपसंचालक नगर विकास मनीष भीषनूरकर, नगर अभियंता सारिका आकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी,अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे,  सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,अनिल चराटे, आरोग्य अधिकारी राखी माने, उप-अभियंता किशोर सातपुते, उद्यान प्रमुख किरण जगदाळे सर्व विभागीय अधिकारी  उपस्थित होते.

          सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरिता 11 विसर्जन कुंड तर 78 संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. तुळजापूर रोड येथील खाण, विष्णू घाट,गणपती घाट त्याचबरोबर घरकुल येथील माढा विहीर तसेच इतर विसर्जन कुंड, गणपती विसर्जनासाठी महापालिकेने  तयारी पूर्ण केली असून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, झाडांचे फांद्या कट करणे तसेच लाईटची व्यवस्था त्याचबरोबर श्री ची मूर्ती संकलनासाठी व विसर्जनासाठी ७ क्रेन , ३ होडी  १०४ गाड्यांची  व्यवस्था करण्यात आली असून त्याचबरोबर १८ घंट्याकडे ३ आरसीएस गाड्यासह ८ मुख्य आरोग्य निरीक्षक, ५० आरोग्य निरीक्षक,१८० सफाई कर्मचारी  तसेच गणेश मूर्ती संकलना केंद्र व विसर्जन कुंड येथे ९०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.

       दरम्यान हिप्परगा खाण, नियोजन भवन, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, नवीवेस पोलीस चौकी या अग्निशामक विभागाचे गाड्या उभे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टरसह ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मिरवणूक मार्गावरील मोकाट जनावर यांचे बंदोबस्त करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व विसर्जत कुंड्यातील सालाबादप्रमाणे बॅरिगेटिंग, फ्लेक्स,मंडप,लाईट, स्पीकर इत्यादीची सोय करण्यात आली असून त्याचबरोबर कंबर तलाव,गणपती घाट,हिप्परगा खान येथे सी.सी.टीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. विसर्जनापूर्वी राहिलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *