श्रींच्या आगमनासाठी महापालिका प्रशासन सज्ज….. आयुक्तांनी केली विसर्जन कुंडांची पाहणी

गणेश विसर्जना साठी महापालिका यंत्रणा सज्ज…

महापलिका आयुक्त शीतल तेली – उगले, पोलीस आयुक्त एम.राजकुमार  यांनी विसर्जन कुंडाची केली पाहाणी….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज 

सोलापूर दि. ३० ऑगस्ट – सोलापूर महापालिकेच्या वतीने श्रीगणेश विसर्जनाच्या नीटनेटकी नियोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले, पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी शहरातील १२ विसर्जन कुंड यांची पाहणी केली. यावेळी  उपायुक्त मच्छिंद्र घोलप, पोलीस उपायुक्त  विजय काबाडे, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, नगर अभियंता सारिका आकुलवार , उप अभियंता किशोर सातपुते, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.

          सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरिता महापालिकेच्या आयुक्त, पोलीस आयुक्त यांनी हिप्परगा येथील खाण, म्हाडा विहीर, विडी घरकुल, एम.आय.डी.सी कुंड, अशोक चौक पोलिस मुख्यालय विहिर, मार्कंडेय उद्यान, सुभाष उद्यान, गणपती घाट, विष्णू घाट, धर्मवीर संभाजी तलाव, रामलिंग नगर विहीर, विष्णू मिल, देगाव,  बसवेश्वर नगर, या विसर्जन कुंडच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी सुरु केली असून विसर्जनाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

श्रींचे आगमन दृष्टिक्षेपात आले आहे. गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, झाडांचे फांद्या कट करणे तसेच लाईटची व्यवस्था त्याचबरोबर श्री ची मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी गाड्यांची, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येत असून शहरातील एकूण ८४ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच विसर्जनापूर्वी राहिलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले  यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावर्षीचा गणेशोत्सव निर्वीघ्नपणे व सुरळीत पार पाडावा अशा प्रकारच्या प्रयत्न महापालिकेकडून  राहील अशी माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपले गणेश मूर्ती संकलनासाठी द्यावे.

– शीतल तेली-उगले, आयुक्त सोलापूर महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *