गणेश युगच्या लाल मातींपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ 

शहरात इको फ्रेंडली गणेश मूर्तींचा वाढला ट्रेंड……

गणेश युगच्या लाल मातींपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ……..गणेशभक्तांनी केले इको फ्रेंडली गणपतीचे आवाहन 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज 

सोलापूर,  दि. ३१ ऑगस्ट – सुखकर्ता दुखहर्ता वरदविनायक श्री गणेशाचे आगमन अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपले आहे. यासाठी गणेश भक्तांमध्ये आतुरता आणि उत्कंठा लागलेली आहे. सध्या शहरात इको फ्रेंडली गणपतींचा मोठा ट्रेंड सुरू झाला आहे. कोरोना काळापासून घरामध्येच गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गणेश भक्त इको फ्रेंडली गणेशमूर्तींकडे वळालेले दिसत आहेत.

यामध्ये गणेश युग यांचे नाव सर्वप्रथम घेतले जात आहे. गणेश युग यांच्या लालमाती पासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ सध्या शहरात दिसून येत आहे. विविध आकारातील आणि मुद्रेतील गणपती बाप्पा भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गणपती बाप्पांच्या मूर्ती पाहताना चिमुकले..

              दरम्यान वरदविनायक गणपती बाप्पा सात सप्टेंबर रोजी घरोघरी विराजमान होणार आहेत. त्यासाठी सुमारे पंधरा दिवसांपासून गणपती बाप्पांचे शहरात स्टॉल थाटले गेले आहेत. या स्टॉलमध्ये असंख्य गणेश भक्तांनी आपला आवडता गणपती बाप्पा बुक केला आहे. लालमाती पासून बनवलेल्या गणपतीमध्ये सिद्धिविनायक, लालबाग, दगडूशेठ, टिटवाळा, नाना पाटेकर, शुर्पकर्ण आदिंसह विविध मुद्रेतील बाप्पा भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयापर्यंत या मूर्तींचे दर आहेत.

अवघ्या अर्ध्या तासांमध्ये इको फ्रेंडली गणपतीचे घरामध्येच विसर्जन करता येते.

शाडू व लाल माती पासून बनवलेले इको फ्रेंडली गणपती भक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरत आहेत. सहा इंच ते अडीच फुटापर्यंतचे गणपती आमच्याकडे बनवले जातात. त्यामध्ये १२० प्रकारचे विविध मुद्रेतील गणपती बाप्पांचे मूर्ती उपलब्ध करण्यात आले आहेत. सुमारे एक गणपती बनवण्यासाठी तीन तासाचा कालावधी लागतो. अवघ्या अर्ध्या तासांमध्ये यागणपतीचे घरामध्येच विसर्जन करता येऊ शकते.

– विकास गोसावी, मूर्तिकार गणेश युग सोलापूर.

 

नाविन्यपूर्ण गणपती बाप्पांच्या मूर्तीं उपलब्ध

इको फ्रेंडली गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत. गणेश युग यांच्याकडे नाविन्यपूर्ण गणपती बाप्पांच्या मूर्तीं उपलब्ध आहेत. दरवर्षी गणेश युग यांच्याकडून गणेश मूर्तींची खरेदी करून घरांमध्ये प्रतिष्ठापना करतो. यातून आमच्या परिवाराला एक आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो.

– किरण सुरतवाला, गणेशभक्त.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *