ड्रेपिंग गणपती बाप्पांचा वाढला ट्रेंड….
गौरी गणपती सणाला वैविध्यपूर्ण वेशभूषा परिधान केलेल्या गणपतींचा हटके लूक …!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दी. ११ सप्टेंबर – सुखकर्ता दुखहर्ता वरदविनायकाचे आगमन भक्तांच्या घरोघरी मोठ्या आनंदात झाले. गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांमध्ये मोठी आतुरता लागली होती. शनिवार ( दि. ७ ) सप्टेंबर रोजी गणरायाचे भक्तांच्या घरोघरी आगमन झाले आहे. आपल्या गणपती बाप्पाची सौंदर्यता खुलवण्यासाठी भक्तांनी ड्रेपिंग ट्रेंड सुरू केला आहे.
या नव्या ट्रेंडनुसार गणपतींना आकर्षक असे वेशभूषा आणि केशभूषा साकारली जात आहे. नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण असे ड्रेपिंग केलेले गणपती गणेश भक्तांच्या पसंतीस उतरत आहेत. भरजरी वस्त्र, मुलायम पितांबर , डोक्यावर पुणेरी पेशवाई पगडी , रेशमी फेटा, असे वस्त्र परिधान केल्यानंतर सौंदर्यपूर्ण मुद्रेतील बप्पा आकर्षक भासत आहेत. यंदाचा गणेशोत्सव पारंपारिक वेशभूषणे साकारलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीने साजरा होत आहे. गौरी गणपती सणाला ड्रेपिंग फीवर चढला आहे.
गौरीसह गणपती देखील आकर्षक वस्त्रांमध्ये खुलून दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे नवीन ट्रेंड सुरू झाले आहे. विविध आकारातील आणि रूपातील गणपती बाप्पा भक्तांच्या भेटीला येत आहेत. श्रीकृष्ण , कोळी , महादेव , अशा विविध रूपातील गणपती बाप्पांना, वस्त्र अलंकार परिधान केले जात आहेत. भक्तांच्या मागणीप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती सजवली जात आहे.
गणेशभक्तांच्या मागणीप्रमाणे गणपती बाप्पाला ड्रेपिंग मधून सजवले जाते.
सध्या भक्तगण गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा करत आहेत. गणपती बाप्पांचे रूप अधिक देखणे आणि खुलून यावे, यासाठी ड्रेसिंग केले जात आहे. भरजरी वस्त्र परिधान करून पारंपारिक वेशभूषा साकारली जात आहे. यासाठी भरजरी वस्त्र , वेलवेट कापड , हिरे , माणिक , मोती असे विविध सजावटीचे साहित्य मुंबईहून मागवले जात आहे. या साहित्यांच्या माध्यमातून गणपती सजवले जातात. यंदाच्यावर्षी ड्रेपिंग गणपतीची मागणी वाढलेली आहे.
– श्रीकांत गायकवाड , ड्रेपिंग कलाकार
एकंदर गौरी गणपती सणाला नव्या ड्रेपिंग ट्रेंडचा फिवर चढला असून, प्रत्येक गणेशभक्त ड्रिपिंग गणपतीकडे आकर्षित होत असल्याचे चित्र गणेश भक्तांच्या घरोघरी दिसून येत आहेत.