सवाद्य रथोत्सवाने होणार आत्मज्योत प्रज्वलित ! होटगीकडे  मंगलवाद्याने मिरवणुक ठेवणार प्रस्थान…

सवाद्य रथोत्सवाने होणार आत्मज्योत प्रज्वलित !

उत्तर कसब्यातील होटगी मठातून मौजे होटगीकडे  मंगलवाद्याने मिरवणुक ठेवणार प्रस्थान…

श्री वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.०५ फेब्रुवारी

श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री  बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे अध्यक्ष श्री चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

               दरम्यान, गुरुवार (दि.०६) फेब्रुवारी रोजी पहाटे२.०० वा. उत्तर कसव्यातील होटगी मठात व मौजे होटगी  ता.द.येथील मठात  शिवाचार्यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रद्धांजली समर्पण सभा होणार आहे. पहाटे ५.०० वा. काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात श्री चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे आत्मज्योत शिरावर घेऊन हजारो भक्तगणांच्या समवेत भक्तीमय वातावरणात उत्तर कसब्यातील होटगी मठातून मौजे होटगी ता.द.सोलापूर कडे सवाद्य मिरवणुकीने मार्गस्थ होणार आहेत. श्री वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त  बाळीवेस येथील मठात बुधवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.००वाजता श्री गुरु गादीस संगीत महारुद्र पूजा,  सहस्त्रबिलवारचन सायंकाळी ६.०० वा.शिवाचार्यांच्या सान्निध्यात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. रात्री ८.०० वा.गीतसंध्या व १०.०० वा. भजन व किर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रविवार  २६ जानेवारी ते बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी पर्यंत बाळीवेस व मौजे होटगी ता.द. सोलापूर येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री सिद्धांत शिखामणी पारायण व बाळीवेस मठात भजन, भारुड व किर्तन कार्यक्रम संपन्न झाला.

                गुरुवार दि.६ फेब्रुवारी सकाळी ११.०० वा. आत्मज्योतीचे होटगी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येणार आहे. सायं. रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वा. नंदीध्वज व पालखी उत्सव सायंकाळी ७.०० वा. पाळणा रात्री ८.००वा.शोभेचे दारूकाम व रात्री ९.३० वा.कुंभारी ता.द. सोलापूर येथील नाट्यसंघ यांच्या वतीने आयोजित केलेला श्री चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी महात्मे हे सुंदर सामाजिक नाटक सादर होणार आहे संस्थेने आयोजित केलेल्या या सर्व कार्यक्रमात भक्तगणानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *