महिलांसह मुलींच्या संरक्षणाबरोबरच सुख, शांती आणि एकात्मतेसाठी साकडे…
तिसरा श्रावणी रविवारी ६८ लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हिजनचा उपक्रम…
सोलापूर व्हिजन
सोलापूर , दि. २५ ऑगस्ट – तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंग पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भक्तगणांनी हर्र बोला हर्र… चा जयघोष करीत राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख, शांती आणि एकात्मतेसाठी साकडे घालण्यात आले.
बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यापदयात्रेत वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, संजय साखरे, विजयकुमार बिराजदार, अरुण पाटील, राहुल बिराजदार, मन्मथ कपाळे, गणेश सूर्यवंशी, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, कलावती स्वामी मल्लेश पेद्दी, संगीता शेरला, गीता फलमारी, नूतन नलावडे आदी भक्तगण सहभागी झाले होते. सकाळी ७ वाजता बसवराज सावळगी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पदयात्रेचा समारोप दुपारी ३ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला.
पदयात्रेच्या मध्यंतरात मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालय येथे दीपकभाऊ निकाळजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ व चहापान देण्यात आले. तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे अमित कलशेट्टी यांच्या वतीने थंड सुगंधी दुधाचा प्रसाद देण्यात आला.

पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे-स्वामी, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, बसवराज बेऊर, बापू जाधव, मल्लिनाथ सोड्डे, महेश गुड्डद, दीपक पटणे, महादेव कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.
महाविद्यालयीन तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग
स्नेहा दोडमनी, दिपाली मजगे, कोमल फाळके, स्नेहल आलुरे, अश्विनी दसाडे, लक्ष्मी आलूरे, ज्योती अक्कलवाडे, अक्षता जंगवाली, तनिषा यादगुळे, आरती चडचणकर, अश्विनी पाटील, शिवगंगा पुस्के या महाविद्यालयीन युवतींनी पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
६८ लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूर शहर परिसरात स्थापित केलेल्या ६८ लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य भक्तांना लाभते अशी आख्यायिका सांगितले जाते. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून पिढीच्या प्रमाणे ही पदयात्रा आज तव्यात सुरू आहे.
– शिवानंद उमाकांत सावळगी , अध्यक्ष ६८ लिंग भक्त मंडळ