भारतीय सैन्याचा पाकिस्तानवर एअर स्ट्राइक ; सोलापूर शहरात आनंदाचे वातावरण
राष्ट्रप्रेमी सोलापूरकर व उद्धवसेनेचा जल्लोष ; जोडेमार आंदोलन करत पाकिस्तानचा केला निषेध

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ मे
पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या तळावर भारतीय वायुसेनेने यशस्वी हल्ला करून पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेतला. यावेळी पाकिस्तान मधील विविध नऊ आतंकवादी तळावर हल्ला करत अतिरेक्यांचा खात्मा केला. वायुसेनेच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल भारतीय सेनेचे तसेच पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी समस्त राष्ट्रप्रेमी सोलापूरकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने मंगळवार पेठ पोलीस चौकी येथे एकच जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिफ मुनीर, पाकिस्तानी झेंडा व अतिरेक्यांचे फोटो रस्त्यावर टाकून त्यांना जोडे मारण्यात आले. त्यानंतर जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय ! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, सूनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान, दूध मांगो खीर देंगे कश्मीर मांगो चीर देंगे, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख महेश धाराशिवकर, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, शहर समन्वयक संताजी भोळे, लहू गायकवाड, विजय पुकाळे, संदीप बेळमकर, सोमशंकर कंठीमठ, सुरज रेवणकर, दिगंबर पालनकर, अनिल बिराजदार, नागराज कंदकुर, ऋषिकेश धाराशिवकर, योगेश कंटिमट, राजेश हेबळे, राहुल वांगी, अमेय कळसकर, मनोज कामेगावकर, पिंटू कानेगावकर, धनंजय तपासे, संतोष पोतदार, गणेश गडकरी, अमोल मासाळ, निलेश हंचाटे, सुरज दीक्षित, कालू राय, आदीसह समस्त राष्ट्रप्रेमी सोलापूरकर, शिवसैनिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
देशाबाहेरील अतिरेक्यांना मारले आता देशांतर्गत कारवाई करा.
देशाबाहेरून येणाऱ्या आतंकवाद्यांचा खात्मा जवानांनी केला आहे. मात्र भारत देशांतर्गत अनेक गद्दार अतिरेकी लपून बसलेले आहेत. अशा आतंकवाद्यांचा खात्मा देखील गरजेचा आहे. आतंकवाद्यांची मानसिक प्रवृत्ती मिटवली पाहिजे. सदरचा जल्लोष देशाच्या जवानांना भारतीय नागरिकांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच जनतेला समर्पित आहे. जनतेच्या रेट्यामुळे सरकारने कारवाईचे हे कडक पाऊल उचलले आहे. भविष्यात देखील अशाच पद्धतीने आतंकवादी हल्ल्यांना प्रतिउत्तर देणे गरजेचे आहे.
– महेश धाराशिवकर, उद्धव ठाकरे शिवसेना शहरप्रमुख
इतर देशांनी भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये.
पाकिस्तान सोबत झालेल्या यापूर्वीच्या युद्धात देखील भारतीय सैन्याने लढाई जिंकलेली आहे. आता सुद्धा भारतीय जवानांनी आपले युद्ध कौशल्य दाखवत अतिरेक्यांचा खत्म केला आहे. जगातील चौथ्या क्रमांकाची भारतीय सेना आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये. अन्यथा त्याची गत पाकिस्तान प्रमाणे होईल. या हल्ल्याचे श्रेय भारतीय जवान, भारतीय नागरिक तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.
– प्रताप चव्हाण, जिल्हा उपप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे