ज्योती वाघमारे यांची मोची, पद्मशाली आणि लोधी समाजासाठी आर्थिक महामंडळाची मागणी …!

ज्योती वाघमारे यांची मोची, पद्मशाली आणि लोधी समाजासाठी आर्थिक महामंडळाची मागणी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन ..!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. १२ ऑक्टोबर – दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्यावतीने आझाद मैदानावरील घेण्यात आलेल्या मेळाव्यात राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचे तडफदार भाषणावर झाले. दसऱ्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्योती वाघमारे गेले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.

            भेटीदरम्यान ज्योती वाघमारे यांनी स्वतःसाठी काहीही न मागता आमच्या समाजातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी तीन महामंडळे मागत त्यांना प्रत्येकी शंभर कोटीचा निधी देण्यात यावा, अशी मागणी वाघमारेंनी केली.

मोची समाजासाठी बाबू जगजीवन राम आर्थिक विकास महामंडळ, पद्मशाली समाजासाठी श्री मार्कंडेय महामुनी आर्थिक विकास महामंडळ आणि लोधी समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. आणि या तिन्ही महामंडळांना प्रत्येकी १०० कोटींचा निधी देण्यात यावा. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महामंडळाच्या बैठकीत निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

   दरम्यान विजयादशमी सणाच्या दिवशी आझाद मैदानावरील झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रणिती शिंदे यांच्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे व रश्मी ठाकरे यांच्यावर ही तोफ डागली.

शहर “मध्य” मतदारसंघावर प्रबळ दावेदारी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्योती वाघमारे यांचे वजन वाढल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर शहर मध्य मतदारसंघाची दावेदारी ज्योती वाघमारे यांनी निश्चित केली आसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महामंडळे जाहीर करण्याच्या सूचनेनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा ज्योती वाघमारे यांना सुटणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *