उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व महाप्रसाद वाटप ; शहर शिवसेनेचा उपक्रम…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दी २७ जुलै – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले. शहर शिवसेनेकडून हा उपक्रम राबवण्यात आला.
विजयपूर रस्त्यावरील जागृत मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावी यासाठी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून प्रार्थना करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, उपजिल्हाप्रमुख प्रमुख रविकांत कांबळे, उपशहरप्रमुख रेवण बुक्कानुरे, शहर समन्वयक अजय खांडेकर, उपशहरप्रमुख राम वाकसे, महेश गिराम, काटकर, शिवसेना कॉलेज कक्ष उपजिल्हाप्रमुख, अनिरूद्ध दहिवडे, मयुरेश धानगुडे, नितीन काटकर, जी. चंद्रकांत, विद्यानंद स्वामी, नितीन कुलकर्णी, कृष्णाजी शिंदे, बाबुराव रेवरे, महेश बिडवे, सत्यम तिवारी, भास्कर बंदपट्टे, ईरेश स्वामी, अजीज मुल्ला तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.