प्रत्येक सप्ताहात आरोग्य शिबिराचे आयोजन – मनीष काळजे
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी व गिरणी कामगारांचा मेळावा
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर, दी.२ मार्च
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या पुढाकाराने शिवसेना भवन सात रस्तायेथे एसीएस हाॅस्पीटल आणि सोलापूर सिटी हाॅस्पीटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरातील प्रलंबित असलेला गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मुंबईच्या धर्तीवर सोलापूर शहरातील गिरणी कामगारांनाही त्यांच्या हक्काची घरे मिळावीत. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावावा यासाठी आग्रह धरला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळजे यांच्या पाठपुरावाला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईच्या धर्तीवर सोलापुरातील गिरणी कामगारांना घर देण्याच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून, तो लवकरच मार्गी लागेल गिरणी कामगारांच्या घरा बरोबरच त्यांचे आरोग्यही उत्तम राहिले पाहिजे. अशा सुचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरात हृदयरोग तपासणी, डोळे तपासणी, ईसीजी, रक्त तपासणी या सह सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरास जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
गिरणी कामगार अतिशय हालाखिचे जीवन जगत असून त्यांना आपल्या आर्थिक अडचणीमुळे आरोग्याकडे लक्ष देणे ही जिकरीचे जात आहे गिरणी कामगारांच्या घराबरोबरच आमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्य दूत मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी घेतल्याबद्दल सर्व गिरणी कामगारांनी समाधान व्यक्त करत अंतकरणापासून मनीष काळजे यांचे आभार मानले. या आरोग्य तपासणी शिबिरास प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.सिद्धांत गांधी, डॉ अक्षय शिवशरण, चेतन नागराशी, स्वाती दिवेकर, रवी दिवटे, सागर फुलारी, सौरभ लामतुरे, नागेश गावडे, ईरय्या स्वामी, जयवंत शेळके, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ माशाळ, सुमित मनसावले,नितीन गायकवाड,अक्षय पकाले, योगेश काळजे,रोहित बिलोरीवाले, रितेश जाधव,चेतन दिक्षित यांनी परिश्रम घेतले
प्रत्येक आठवड्याला नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर…
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भवन सात रस्ता येथे प्रत्येक आठवड्याला सोलापूर शहरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
मनिष काळजे, शिवसेना जिल्हाप्रमुख