मुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या लाडक्या बहिणींसाठी प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यातर्फे पाठवला निरोप..! आगामी काळात सोलापूरात येण्याचे दिले वचन.

दौरा मुख्यमंत्र्यांचा चर्चा मात्र ज्योतीताईंच्या  संपर्क कार्यालयाचीच…..

मुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या लाडक्या बहिणींसाठी प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यातर्फे पाठवला निरोप..!

आगामी काळात सोलापूरात येण्याचे दिले वचन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. ८ ऑक्टोंबर – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास कल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार होती. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे ४० हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती. यासाठी राज्य शासनाने महिलांच्या प्रवासासाठी सुमारे ४०० हून अधिक एसटी बसेसची सोय करण्याचा आली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने सर्व दौरे कार्यक्रम रद्द करण्यात आले.

          दरम्यान सोलापूर शहरातील जय शंकर तालीम येथे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच संपर्क कार्यालयाची सर्वत्र होती.  ढोलीबजा, लहान मुलींचे लेझिम पथक, धमाका बौंजो तयार होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनीवरून संपर्क झाल्यानंतर सदरचा मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. ज्योती वाघमारे यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवताना आगामी काळात लवकरच सोलापुरात येईल असे अभिवचन दिले. त्यामुळे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याहस्ते ज्योती वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी डॉ. ज्योती वाघमारे, युवासेना प्रियदर्शन साठे दीपक पाटील, भीमा वाघमारे आदींसह मोट्यासंखेने शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी साधला संपर्क…

राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाला. प्रकृती बिघडल्यामुळे सदरचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आल्यानंतर, राज्य प्रवक्त्या ज्योती ताई वाघमारे यांच्या तर्फे उपस्थित लाडक्या बहिणींना नाराज न होण्याचे सांगत आगामी काळात नक्कीच सोलापूरचा दौरा करेन असे वचन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *