आमच काम बोलतय… मा.मनीष काळजे अण्णा काळजे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर
सोलापूर शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पाया घट्ट रोवण्याचे काम जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाले. सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून आपल्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या मनीष काळजे यांनी अल्पावधीतच सोलापूरकरांच्या मनावर राज्य गाजवले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी सुमारे अडीच कोटीहून अधिक विकास कामे शहराच्या विविध भागात तसेच विशेषतः हद्दवाढ भागात कामे केली. ड्रेनेज लाईन, रस्ते, दिवाबत्ती, अशा विविध मूलभूत सुविधांसाठी नेहमी तत्पर राहिले.

विशेषतः सोलापूर महापालिका अस्तित्वात नसताना प्रशासकांच्या काळात निधी खेचून आणून विकासकामे केली. हद्दवाढ भागातील अनेक विकास कामांना प्राधान्य देऊन गतीने कामे केली. राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यातून विविध कामांना तात्काळ मंजुरी देऊन विकासाची नांदी सुरू केली. प्रभाग क्र. २१ येथील लक्ष्मीविष्णू व गुमास्ता सोसायटी पाईपलाईन व बगीचा सुशोभिकरण निधी रु.४० लाख दिले.. अशा पद्धतीने शहरातील विविध प्रभागात निधी देऊन प्रभागाचा पर्यायने समाजाचा विकास करण्यास हातभार लावला दिसत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणात महत्त्वकांक्षी झेप घेणाऱ्या… अल्पावधीतच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मा. श्री मनीष अण्णा काळजे यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा… शब्दांकन :- श्री.अक्षय पकाले प्रभाग क्र.२१
वाढदिवस अभिष्टचिंतन ११ नोव्हेंबर
शिवसेना जिल्हाप्रमुख मा.मनिष काळजे आण्णासाहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
शुभेच्छुक
अक्षय पकाले, समर्थ माशाळ, सेवालय फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मनिष(आण्णा) काळजे मित्र परिवार…