दिलेला शब्द पाळणारा आपला हक्काचा काळजीवाहू माणूस मनीष काळजे……

दिलेला शब्द पाळणारा आपला हक्काचा काळजीवाहू माणूस मनीष काळजे…… 

मुख्यमंत्री निधीतून विकास कामांची गंगा आणली घरोघरी…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि १४ ऑगस्ट – लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ जागावाटपात पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघ जागेवर अनेकांचा डोळा  आहे.

परंतु शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचा सपाटा लावून आपला हक्क सांगितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती गल्ली ते दिल्ली इथ पर्यंत पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी शहरात विविध ठिकाणी मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून विकास कामे केली असून त्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मनीष काळजे यांनी मोठी झेप घेतली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द ही एक आतुलनीय आणि प्रेरणादायी ठरणारी आहे. शेतकरी कुटुंबातील मुलगा ते सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी झटणारा काळजीवाहू नेता अशी ख्याती आता वाढत चाललेली आहे. त्यांचे नागरिकांच्या प्रति असणारे आत्मीय भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर नवनवीन जबाबदारी देऊन शेतकरी तसेच सामान्य नागरिक यांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी तसेच विविध विकास कामे करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

लोकार्पण केलेली विविध विकास कामे…

– श्री छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ डाळींबआड इमारत बांधकाम आणि विकसन आणि महात्मा बसवेश्वर चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर विकसित करण्याच्या कामांसाठीएकूण ७० लक्ष रूपये निधी खर्च करण्यात आला.

– देगांव येथील कमलाकर घर ते सुपाते घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, गणेश कराळे घर ते आळंगे घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकणे आणि पार्वती नगर भागात पिण्याच्या पाण्याची ४” आणि ६” पाईपलाईन टाकणे या कामांसाठी एकूण ३० लक्ष रूपये खर्च करण्यात आले.

–  कुमठा नाका येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी येथे पाण्याची ६” पाईप लाईन टाकण्याच्या कामासाठी १५ लक्ष रूपये निधी खर्च करण्यात आला. अत्यावश्यक सेवासुविधा पुरवताना प्राधान्यक्रमा नुसार तातडीने खर्च करण्यात आला.

–   प्रभाग क्रमांक १४ मधील जिजामाता रुग्णालय येथील परिसर विकसित करणे आणि बेगम पेठ येथील मरकज मस्जीद सुशोभिकरण या साठी एकूण २० लक्ष रूपयांचा निधी खर्च करण्यात आला.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काळजे यांनी निवडणुकीची पेरणी आगोदर पासूनच केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर अनेक बहिणींच्या हातून आपल्या मनगटावर राखी बांधून त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि आपले हात बळकट केले आहेत.

लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी जाहीर रीत्या दिली आहे. एकंदरीत नागरिकांच्या मनातील भावी आमदार म्हणून त्यांनी एक वेगळीच प्रतिमा तयार केली दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *