धर्मवीर २ दणक्यात रिलीज..!
धर्मवीर चित्रपटासाठी केले अख्ख थेटर बुक…. आपली खुर्ची शिवसैनिकाला देऊन मनिष अण्णा उतरले प्रेक्षकांच्या मनात..!!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. २७ सप्टेंबर – कट्टरशिवसैनिक स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘धर्मवीर २’ संबंध महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात प्रदर्शित झाला. सोलापुरातल्या पहिल्या शोचे शहरातील प्रत्येक शिवसैनिकाला मोफत दाखवून सामनावीर मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजेच ठरले!
दरम्यान धर्मवीर २ च्या आजच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ ला शिवसैनिकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. आनंद दिघे यांच्यावरील शिवसैनिकांचे प्रेम आणि मनिष अण्णांनी प्रायोजित केलेला मोफत शो यामुळे शिवसैनिक सकाळपासून रांगा लावून हजर होते. चित्रपटाला आलेल्या सर्व प्रेक्षकांना मनिष अण्णांतर्फे फेटे बांधण्यात आले..
चित्रपटाच्या पोस्टरवरील आनंद दिघे यांच्या फोटोस दुग्धाभिषेक करण्यात आला. भावनिक आणि भारून गेलेल्या अवस्थेत सर्व शिवसैनिक चित्रपटगृहात प्रवेश करत होते. चित्रपट संपल्यानंतर प्रत्येकानेच अप्रतिम चित्रपट असल्याचे सांगितले. तरूण आणि किशोरवयीन युवकयुवतींनी दिघेंबद्दल अनेक गोष्टी नव्याने कळल्या. त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला असल्याचेही सांगितले.
एकीकडे चित्रपट पाहण्यासाठी शिवसैनिक तसेच अनेक रसिक प्रेक्षकांनी गर्दी केल्याने मनीष काळजे यांनी अख्ख थेटर बुक केलं, पण आपली खुर्ची सर्व सामान्य शिवसैनिकाला देऊन स्वतः खाली बसून धर्मवीर-२ चित्रपट पाहून आपल्या गुरु विषयी आत्मीयता प्रकट केल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले..