कट्टर शिवसैनिकांनी सोडली शिवसेनेची सोडली साथ ; छत्रपती संभाजी राजांच्या स्वराज्य पक्षात केला प्रवेश ;
भाजपच्या विरोधात पुकारला बंड; उद्या भरणार उमेदवारी अर्ज
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२८ ऑक्टोंबर – भाजपच्या राजकारणाला कंटाळून आणि शिवसेनेच्या नरमाईच्या भूमिकेमुळे अखेर शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, युवासेना प्रमुख उमेश गायकवाड यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला असून ते उद्या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

दरम्यान पत्रकार परिषद घेत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी अमोल शिंदे, शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मनीष काळजे, आणि शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी उमेश गायकवाड यांना एबी फॉर्म देण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्व ताकदिनिशी लढवणार असल्याचे यावेळी अमोल शिंदे, मनीष काळजे, मनोज शेजवाल, आणि उमेश गायकवाड यांच्यावतीने जाहीर करण्यात आले.
खऱ्या अर्थाने जनतेचे स्वराज्य..
छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपातून राज्यात स्वराज्य निर्माण करू. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करू आणि सर्वस्व पणाला लावू. खऱ्या अर्थाने ते जनतेचे स्वराज्य म्हणून ओळखले जाईल.
अमोल शिंदे,उमेदवार
उठाव भाजपा च्या विरोधात….
आम्ही भाजपा विरोधात बंड पुकारला आहे आम्ही शिवसैनिक आहोत अन्याय सहन करणार नाही…. हा उठाव भाजपा च्या विरोधात…. आणि शहरच्या विकासासाठी… आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते…. भगव्या सोबत होतो आज भगव्या सोबतच….
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष…
मनीष काळजे,उमेदवार