टायगर अभी जिंदा है ! सिर्फ नाम ही काफी है



प्रवाहाच्या विरोधात जाऊन एकटा लढला अन् जिंकला..

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.१६ जानेवारी
राज्याच्या सत्तेतील दोन मित्र पक्ष सोलापुरात मात्र कट्टर दुश्मन झाले… महापालिकेवर तसेच आपल्या प्रभागात आपलाच वट्ट असल्याचा दाखवण्याचा चंग त्यांनी बांधला होता. मतदानाच्या आदल्या दिवशी आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या. अरे तू रे च्या गोष्टी घडू लागल्या.. पालकमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर दोस्ती दुश्मनीत बदलली गेली. मतदानाच्या आदल्या रात्री साम-दाम-दंड भेद वापरण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अशात तुफानी वादळातही एकनाथ शिंदे यांचा कट्टर मावळा अमोल बापू शिंदे यांनी आपला गड कायम राखला. त्यामुळे आज सोशल मीडियावर “टायगर अभी जिंदा है!”अशा आशयाच्या पोस्टर्स व्हायरल होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजप विरुद्ध शिवसेनेचा हाच सामना पहावयास मिळाला. विरोधी पक्ष केवळ नावालाच होते. सत्तेतीलच शिवसेनेने व्यक्ती केंद्रित आणि कुटुंबकेंद्रीत भाजपच्या विजयाच्या घोडदौडीला ब्रेक लावण्याचा चंग बांधला होता. त्यानुसार प्रभाग ७ मध्ये त्यांनी तसा करिष्मा करून दाखवला. धनुष्यातील बाणाने कमळाच्या देठाचा वेध घेतल्याचे चर्चा प्रभागात रंगू लागली आहे. तीन बाण एक कमळ आल्याने जातीचे समीकरण समोर आले आहे.

येथे भाजपने निष्ठावंतांना डावल्याने नाराजीचा सूर कायम होता. मात्र नेत्यांची बैठक घेऊन त्यांची बोळवन केली. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याच्या मनस्थितीत उतरलेल्या कार्यकर्त्यांनी रात्र रात्र जागून काढली. मानसिक शारीरिक त्रास सहन केला.. त्याचे फळ आज बापूंच्या विजयी रूपात त्यांना मिळालेले दिसत आहे. शहरातून जंगी मिरवणूक रॅली काढत फटाक्यांची आतषबाजी केली गुलाल उधळला…
बापूंना त्यांच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर उचलून घेऊन जोरदार घोषणाबाजी केल्या.. त्यांच्या राहत्या घरासमोर एकच विजय जल्लोष झाला. स्वर्गीय बाळासाहेब अण्णा शिंदे आणि स्वर्गीय शिवाजी महाराज पिसे या दोघांचे पोस्टर लावून त्यांच्या आशीर्वाद घेतले… यावेळी सारे वातावरण भावनिक आणि उत्साह पूर्ण झाले होते.

एकटा लढला जिंकून आला ; बस नाम ही काफी है ; अशा आशयाचे पोस्टर्स अमोल बापूंच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्टर झुळकू लागल्याने त्यांच्यासाठी हा विजय किती महत्त्वाचा होत आहे दिसून येत आहे. विजय आणला परंतु आता महापालिकेत विजयी ८७ पुढे ४ शिवसेनेच्या कशा पद्धतीने कामकाज होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आम्ही ४ च पण १०० जणांवर भारी
सोलापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. परंतु आम्ही चार जण त्या १०० जणांवर भारी पडू. गुलाल उधळल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विजय उमेदवार अमोल शिंदे यांनी व्यक्त केली आहे.