राजकारण खालच्या थराला यंत्रणेकडून अटकेची भीती : अमोल शिंदे यांचा आरोप !
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.१४ जानेवारी
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असताना ते सोलापूर महानगरपालिका निवडणूकीच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांना हाताशी धरून रात्रीबेरात्री सोलापुरात फिरून प्रभाग ६ चे मराठा समाजाचे उमेदवार व नेतृत्व अमोल शिंदे, प्रभाग ५ चे दलित चळवळीचे नेते आनंद चंदनशिवे, प्रभाग १५ धनगर समाजाचे नेते चेतन नरोटे यांना संपविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व प्रभाग ७ चे शिवसेनेचे पॅनल प्रमुख अमोल शिंदे यांनी बुधवारी
पत्रकार परिषदेत केला आहे.


आमदार देवेंद्र कोठे यांनी यापूर्वी राजाभाऊ खराडे,त्यानंतर आता अमोल शिंदे आणि आता पद्माकर काळे यांचा वापर करून मराठा समाजाचे नेतृत्व संपण्याचा विडा उचलला असल्याचाही आरोप अमोल शिंदे यांनी यावेळी केला आहे.
महापालिकेत पालकमंत्री आणि आमदार कोठे यांना सभागृहात जी हुजूर करणारी माणसं हवी आहेत.यापूर्वी दडपशाही करून नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप अडचणीत आले. आता महानगरपालिकेतसुद्धा हिच परिस्थिती असून झेडपीतसुद्धा भाजपा षडयंत्र रचत आहे.सोलापूरकरांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे, असेही अमोल शिंदे म्हणाले.
जाणीवपूर्वक आपणास आणि आपल्या कार्यकर्त्यांना अडचणीतआणण्याचा डाव असून, आपणास यंत्रणेकडून अटकेची शक्यता नाकारता येत, नसल्याचेही अमोल शिंदे यांनी सांगितले.