शिवसेना जिल्हाप्रमुख काळजेंनी शिवसेना अन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहले भावनिक पत्र ; व्यक्त केली कृतज्ञता…. सोशल मीडियावर मनीष अण्णांचा काळजावर बोट ठेवणारा बाणा !

फक्त लढ म्हणा…आता ‘शहर मध्य’चे संपूर्ण परिवर्तन हाच ध्यास !!

ध्यास परिवर्तनाचा सोलापुर मध्यच्या सर्वागीण विकासाचा

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २३ सप्टेंबर –

सोलापूर शहरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या सामाजिक कार्यातून एक वेगळा ठसा उमटविला आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या सामाजिक कार्य कर्तुत्वच्या बळावर गरुड झेप घेऊन , आकाशाला गवसणी घालत शहराचा कायापालट करण्याचे ध्येय उराशी बाळगले.  या प्रवासात काळजे यांनी शिवसेनेच्या भगव्या वादळात सामील होऊन स्वतः चे अस्तित्व सिद्ध केले आहे. सामाजिक कार्यातून मजलदर मजल करत त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदापर्यंत यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे. या दरम्यान त्यांनी कृतज्ञता पर पत्र लिहून शिवसेना तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोमन आभार मानले आहेत.

जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचे पत्र…

परिवर्तनाचा ध्यास घेऊन मैदानात उतरल्यानंतर कष्ट होतच नाहीत. गरज असते ती फक्त लढ म्हणणाऱ्या पाठीराख्यांची! आपल्याशी या पत्राद्वारे हितगूज साधण्याचा हेतूच मुळात तुमच्या पाठिंब्यामुळे आपण काय काय करू शकलो आहोत आणि काय काय करणार आहोत ते विशद करण्याचा आहे. हे करत असताना घरच्याच एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असल्याची भावना मनात दाटली आहे. एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण करायचीच हे संस्कार आदरणीय बाळासाहेबांनी बिंबवले.

     धर्मवीर आनंद दिघेंनी वर्तनातून दाखवून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर चालताबोलता आदर्शच आहेत त्याबाबतीत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा! तुमचा पाठींबा आणि एकनाथजींचे आशीर्वाद यामुळे आत्तापर्यंत आपण सोलापूर शहरात ५० कोटींपेक्षा जास्त निधी विकासकामांवर खर्च करू शकलो आहोत. भविष्यात यापेक्षाही अधिक निधी आपण आणू हा विश्वास मला नक्की आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आत्तापर्यंत सोलापूर मध्यमधीलच शेकडो जणांना आपण वैद्यकीय सहाय्यता करू शकलो आहोत. पुन्हा एकदा तुमचा माझ्यावरील विश्वासच इथेही कारणीभूत ठरला आहे. अर्थात समाजकार्य करणे म्हणजे गटारात उतरून घाण साफ करण्यासारखेच असते. कपड्याला चिखल लागतोच.

त्याच प्रमाणे माझ्यावरही केवळ माझ्या कामांमुळे स्वतःची खुर्ची डळमळीत होते आहे हे पाहून खोटेनाटे आरोपच नाही तर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद यावेळी कामी आले. आपल्या सत्याच्या बाजूचाच विजय झाला. आपल्या आजवरच्या नात्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे! ती म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोलापूर मध्यचा नुसता विकासच नाही तर संपूर्ण कायापालट करण्यासाठी झटत राहणार याचा कृतनिश्चय झाला आहे. !

आता गरज आहे ती फक्त आजवर जसे तुम्ही मला प्रेमाने, आपुलकीने, हक्काने ‘लढ’ सांगत आलात तसेच ‘तू लढ’ आम्ही आहोत पाठीशी म्हणण्याची! तुमचे आशीर्वाद आजपर्यंत ज्या खंबीरतेने माझ्या पाठीशी आहेत तसेच आजही असतील तर विजयश्री खेचून आणणे आपल्यासाठी अत्यंत सोपे आहे. एका अति सामान्य शेतकऱ्याच्या परिवारातील मुलाला आपण खूप मोलाची साथ दिली आहे! याची नक्कीच परतफेड होऊ शकत नाही परंतु कर्तव्य म्हणून मी नक्की प्रयत्न करेन !! तुम्ही आणि मी मिळून सोलापूर मध्य बदलून टाकू हा माझा शब्द तुम्हाला!

धन्यवाद…!

शिवसेना

सदैव आपलाच… आण्णा

मनिष रोहिणी अजय काळजे

– शिवसेना जिल्हाप्रमुख, सोलापूर सदस्य, जिल्हा नियोजन समिती, सोलापूर सदस्य सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *