सोलापुरात आघाडीत झाली बिघाडी शिवसेनेने दिला स्वबळाचा नारा…!
काँग्रेसने आघाडीचा धर्म न पाळल्याने शिवसैनिक नाराज…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणूका एकट्याने लढणार – शिवसेना शहरप्रमुख अजय दासरी यांची माहिती
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३० नोव्हेंबर
विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, काँग्रेसच्या खा.प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवारास पाठींबा दिल्यामुळे आमच्या उमेदवारास पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे शिवसैनिक नाराज आसून, आगामी सर्व निवडणुकीत शिवसेना स्वबळाने लढेल असा इशारा शहर प्रमुख अजय दासरे यांनी दिला आहे.
दरम्यान, सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच आघाडी धर्म पाळला नाही. काँग्रेसने शेवटच्याक्षणी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊन आघाडी तोडली. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच काँग्रेसचे उमेदवार पाडा, असे आदेश दिले होते. तरीदेखील निवडणुकीच्या काळात शिवसैनिक गप्प होते. परंतु आता येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढेल, असे सांगत अजय दासरी यांनी सोलापूर शहराचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केल्याचे स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुटला होता. या ठिकाणी आम्ही आमचा उमेदवार दिल्यानंतर, देखील काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही. प्रचारामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला नाही. उलट ऐन मतदाना दिवशी अपक्ष उमेदवार काढावी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आमच्या उमेदवाराला पराभवाला सामना करावा लागला. त्यामुळे शिवसैनिक संतप्त आणि नाराज आहेत. नाराजीचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका सर्व निवडणूका एकट्याने लढणार आहे.