शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पुढाकार  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज शिबिर सुरू 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पैसे मागितले तर शिवसैनिक शिवसेना स्टाईलने उत्तर देणार :- शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे…..

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि ७ जुलै – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या पुढाकारातून त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिबिर आयोजित करण्यात आले होते. याशिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सदरच्या शिबिरात शिवसेनेच्या वतीने एक अर्ज तयार करण्यात आला असून त्या अर्जामध्ये सर्व कच्ची माहिती भरून घेतली जात भरलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून सदरचा अर्ज भरला जात आहे. हा अर्ज भरण्यासाठी कॉलेजचे युवक युती तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.

                       दरम्यान ज्या माता भगिनींना आवश्यक कागदपत्रे काढण्यास अडचणीत आहे अशा महिलांना शिवसेनेच्या वतीने सर्व सहाय्य केले जात आहे. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची सर्व माहिती देऊ नये ही कागदपत्रे काढून घेऊन त्यानंतर ऑनलाईन अर्ज केले जात आहेत. या योजनेपासून सोलापूर शहर जिल्ह्यातील एकही महिला वंचित राहू नये यासाठी महिनाभर हा शिबिर सुरूच राहणार आहे. काही भागात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालक आगाऊ पैसे आकारात आहेत तसेच विविध कागदपत्रे काढण्यासाठी देखील पैशांची मागणी केली जात आहे अशा व्यक्तींवर आता सरकारची आणि शिवसैनिकांची नजर असणार आहे. ज्या ठिकाणी पैसे मागितले जातात त्या ठिकाणी शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही माता-भगिनींनी अर्ज भरण्यासाठी पैसे देऊ नये असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

पैसे मागितले तर शिवसैनिक शिवसेना स्टाईलने उत्तर देणार….

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्या महिलांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत त्या महिलांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत त्यांच्याकडून कागदपत्रे काढून घेतली जात आहेत. आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरला जात आहे. अर्ज भरण्यासाठी काही ठिकाणी पैशांची मागणी केली जात आहे असे ऐकण्यास मिळाले आहे. पैसे मागणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत परंतु या अगोदरच शिवसैनिक आपल्या शिवसेना  स्टाईलने उत्तर देईल त्यामुळे कोणीही पैसे मागू नयेत आणि महिलांनीही पैसे देऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

अमोल शिंदे , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *