प्रभाग ७ मध्ये प्रचाराचा श्रीगणेशा ; अमोल बापूंनी केले शक्तिप्रदर्शन
अमोल बापु शिंदे, अनीकेत पिसे, मनोरमा सपाटे आणि मनिषा कणसे यांच्या प्रचारास पदयात्रेन प्रारंभ युवक आणि माहिलांची तुफान गर्दी
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.४ डिसेंबर
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ प्रभाग क्रं. ७ मधून शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व युवानेते अनिकेत पिसे मनोरमा सपाटे आणि कणसे यांचे प्रचाराचा श्रीगणेशा पदयात्रेनं प्रारंभ करण्यात आला.

थोरला मंगळवेढा तालीम येथे श्री गणेशाच्या पुजानाने पदयात्रेस प्रारंभ झाला. या पदयात्रेत शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, कामगार सेना, विधी सेवा समिती, अंगीकृत सर्व संघटना पदाधिकारी तसेच शिवसैनिक, थोरला मंगळवेढा तालीमचे सर्व सदस्य, संकेत परिवारचे सर्व सदस्य, अमोल बापू शिंदे मित्रपरिवार मोठ्या संखेन उपस्थित होता माहिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती ही पदयात्रा पिंपळा मारुती नवजवान गल्ली,माळी गल्ली, काळी मजीद, बाजीअण्णा मठ,पत्रा तालीम,सळई मारुती,गवंडी गल्ली,मल्लिकार्जुन मंदिर परिसर कुंभारवाडा पंजाब तालीम, चौपाड, याभागातून निघाली.
रॅलीमध्ये ठीक ठिकाणी अमोल बापू शिंदे तसेच सर्व उमेदवारांचं औक्षण करण्यात येऊन त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात येत होत्या अनेकांनी पुष्पहार घालून तसंच पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरून त्यांचं स्वागत केलं एकनाथ शिंदे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण पसरलं होतं, आपण केलेल्या कामाची पावती आपणास सुज्ञ मतदार राजा देईल तसेच लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असा विश्वास अमोल बापू शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला युवकांचा तसेच लाडक्या बहिणींचा उदंड प्रतीसाद रॅलीस मीळाला या रॅलीमध्ये ज्ञानेश्वर सपाटे संकेत भाऊ पिसे प्रकाश अवस्थी पृथ्वीराज दीक्षित कणसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.