सोलापुरात शिवसेनेच्या शिंदेंनी काँग्रेसच्या शिंदेंना काढला चिमटा : मराठा आरक्षणावर टोला हाणत खासदार शिंदेंचा घेतला खरपूस समाचार
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक : मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. याच पार्श्वूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचले आहे, प्रणिती शिंदे या मराठा समाजाच्या मतावर त्या जिंकल्या असून जरांगे पाटील यांच्या पडत्या काळात त्या सोबत राहणं गरजेचे असताना तसे होत नाही, त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्याचे ते म्हणाले… मराठा समाजाची मते मिळवण्यात काँग्रेसला पर्यायाने प्रणिती शिंदे यांना यश आले आहे. मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणाला त्यांनी अद्यापही पाठिंबा दिलेला नाही यामुळे खा.प्रणिती शिंदे यांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते असे सांगत गरज सरो वैद्य मरो ही म्हण या ठिकाणी तंतोतंत लागू होते. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्यांचे प्रकृती ढासळत असताना त्यांच्यामुळे विजयश्री मिळवलेल्या खासदार प्रणिती शिंदे या जरांगे यांना पाठिंबा देत नाहीत ही माणुसकी नाही पडत्या काळात जरांगे पाटील यांच्यासोबत उभे राहणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी तमाम मराठा बांधवांची आणि मतदारांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मराठा समाजाने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे. ज्या लोकप्रतिनिधींना मतदार राजांनी निवडून दिले आहे अशा लोकप्रतिनिधींना मराठा समाज बांधवांच्या मागण्यांचे कसलेही देणे-घेणे नाही वास्तविक पाहता मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस करण्यासाठी त्यांनी घटनास्थळी दाखल झाले पाहिजे परंतु त्यांनी एका शब्दात देखील विचारपूस केली नाही त्यामुळे अशा लोकांपासून मराठ्यांनी सावध राहिले पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवावा का नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे असे सांगत सोलापुरात शिवसेनेच्या शिंदेंनी काँग्रेसच्या शिंदेंना मराठा आरक्षणावर टोला हाणत खासदार शिंदे यांना चिमटा काढला आहे.