माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न : पोलिस चौकीचीही झाली सोय
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत शेळगी येथील नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या दोन मजली बांधकामाचे भूमीपूजन माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आ. विजयकुमार देशमुख यांच्या ७५ लाख रुपयांच्या विशेष मंजूर निधीतून या इमारतीचे बांधकाम करण्यात होणार आहे.शेळगी येथील नागरिकांच्या अधिक सोयीसाठी या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. त्यामुळे माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी शासनाकडून ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे.भूमीपूजनप्रसंगी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपस्थित होते.
माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, शेळगी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय व्हावी याकरिता नागरी आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात येत आहे. तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी याच इमारतीत पोलीस चौकीसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर कारभारी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. आतिष बोराडे यांनी आभार प्रदर्शन केले.याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मनपा अतिरिक्त उपायुक्त संदीप कारंजे, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मनपा शहर आरोग्यधिकारी राखी माने, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, जोडभावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, भाजपा महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, भाजयुमो अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, डॉ. अतिश बोराडे, सिद्धेश्वर बोरगे, मनपा अवेक्षक महेश केसकर, अभिजित बिराजदार, माजी नगरसेवक नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, शालन शिंदे, चंद्रकांत रमणशेट्टी, अविनाश पाटील, संजय कणके, संजय कोळी, राजकुमार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, श्री धानम्मादेवी मंदिरचे ट्रस्टी सिद्धय्या स्वामी, समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुराव नरोणे, शंकर शिंदे, सोमनाथ रगबले, ज्ञानेश्वर कारभारी, विरेश उंबरजे, सुरेश हत्ती, राहुल शाबादे, आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.